Wipro Consumer Care and Lighting Claim for Soap brand Santoor lifebuoy left behind : विप्रो कंझ्युमर केअर अँड लाइटिंग यांनी दावा केला आहे की, त्यांचा प्रमुख साबन ब्रॅ्ंड संतूर हा आता भारतातील सर्वात मोठा साबन ब्रॅ्ंड झाला आहे. त्यांनी हिंदुस्तान युनीलिव्हरच्या लाईफ बॉयला मागे टाकलं आहे. कंपनीचा दावा आहे की, 2025 मध्ये संपूर्ण 2850 कोटी रुपयांचा रिवेन्यू कमावला. त्यामुळे संतूर लाईफ बॉयच्या पुढे गेला आहे. त्यानंतर लक्स तिसऱ्या नंबरवर आहे. मात्र ब्रॅ्ंडने दावा केलेल्या रेवेन्यूची कोणतीही खात्री करणे कठीण आहे.
रशियाकडून तेल खरेदी घटली, अमेरिका भारतावरील अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ हटविणार?
त्यानंतर आलेल्या टीओआयच्या रिपोर्टनुसार विप्रो कंझ्युमर केअर अँड लाइटिंगचं म्हणणं आहे की, त्यांनी अनेक स्रोतांकडून माहिती मिळवली आहे, ज्यावर त्यांचा पूर्ण विश्वास आहे, त्यांचे सीईओ विनीत अग्रवाल यांनी सांगितले की, आमच्यामध्ये आणि लाईफ बॉयमध्ये बराच फरक आहे. एसी निल्सनच्या जानेवारी ते नोव्हेंबर पर्यंतच्या आकडेवारीनुसार संतूरची बाजार भागीदारी 8.60% होती तर लाईक करायचे 12.1 टक्के आणि लक्षची बारा पॉईंट दोन टक्के होती.
GDP म्हणजे काय? सरकारी आणि आर्थिक संस्थांच्या आकडेवारीनुसार देशाची परिस्थिती काय?
मात्र अग्रवाल यांनी ही आकडेवारी देखील योग्य नसल्याचे सांगितले आहे. कारण या आकडेवारी आणखी जास्त असू शकते. संतूर ग्रामीण भागांमध्ये जास्त प्रमाणात वापरला जातो. मात्र त्या ठिकाणी एसी निल्सन तेव्हढं प्रभावी नाही. संतूरची सर्वाधिक विक्री आंध्र प्रदेश, तेलंगाना, कर्नाटक, महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांमध्ये होते. मात्र या ठिकाणी एसी निल्सन प्रभावी नाही.
अंबड व घनसावंगी अतिवृष्टी अनुदान घोटाळा: जालन्यात तलाठ्यांच्या अटकेनंतर साहेब लोकांत भितीचं वातावरण
दरम्यान या सगळ्या दाव्यांवर हिंदुस्तान युनीलिव्हरच्या प्रवक्त्याने म्हटलं की, आम्ही आमच्या प्रतिस्पर्धी ब्रँडची माहिती घेण्यासाठी वेगवेगळे स्त्रोत वापरतो. ज्यामध्ये कंपन्यांनी प्रकाशित केले अहवाल, एसी निल्सन तसेच कंटार यांचा डेटा समाविष्ट असतो. आम्ही व्यक्तिगत एका ब्रँडची बाजार भागीदारी जाहीर करत नाही. सध्या आम्ही एका क्लोज पिरेडमध्ये आहोत.
