Xiaomi 17 Pro Max Launched : Xiaomi ने जागतिक बाजारात मोठा धमाका करत नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन्स लॉन्च केले आहे. कंपनीने चिनी बाजारात Xiaomi 17 , Xiaomi 17 Pro आणि Xiaomi 17 Pro Max मॉडेल्स लॉन्च केले आहे. या स्मार्टफोनमध्ये ग्राहकांना एकापेक्षा एक भन्नाट फीचर्स देण्यात आले आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, Xiaomi 17 सिरीजमधील Pro आणि Pro Max मॉडेल्समध्ये नवीनतम स्नॅपड्रॅगन चिपसेट, Snapdragon 8 Elite Gen 5 आहे. दोन्ही फोन Android 16 वर आधारित HyperOS 3 वर चालतात.
कंपनीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, Xiaomi 17 Pro Max ची किंमत 5,999 युआन म्हणजेच 75,000 पासून सुरू होते. हे 12GB + 512GB मॉडेलसाठी आहे. तर 16 जीबी + 512 जीबी मॉडेलची किंमत 6,299 युआन म्हणजेच 78000 रुपये इतकी आहे.
Xiaomi 17 Pro Max ची किंमत 5,999 युआन किंवा अंदाजे 75,000 पासून सुरू होते. हे 12GB + 512GB मॉडेलसाठी आहे. 16 जीबी + 512 जीबी मॉडेलची किंमत 6,299 युआन म्हणजेच 78000 आहे आणि 16 जीबी + 1 टीबी मॉडेलची किंमत 6,999 युआन म्हणजेच 87,000 आहे. तर 12 जीबी + 256 जीबी मॉडेलसाठी शाओमी 17 प्रो 4,999 युआन म्हणजेच 62,000 पासून सुरू होते.
Xiaomi 17 Pro/Pro Max (Yes, they are skipping 16 to match Apple’s names)
2.9″ Screen on the camera plateau
50MP cameras
6300/7500mAh batteries
100W charging, 50W wireless charging, 22.5W reverse
Snapdragon 8 Elite Gen 5 (New)
(The retro gaming case is not real lol) pic.twitter.com/OsDxGzbCj6— Marques Brownlee (@MKBHD) September 25, 2025
Xiaomi 17 सिरीजमधील Pro मॉडेलमध्ये 6.3-इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. तर Pro Max मध्ये 6.9-इंचाचा डिस्प्ले आहे. दोन्ही डिस्प्लेमध्ये बेस्ट रिझोल्यूशन आणि 3,000 nits ची पीक ब्राइटनेस आहे. दोन्ही फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8 Elite Gen 5 चिपसेट देण्यात आला असून दोन्ही फोन Android 16 वर चालतात, ज्यामध्ये HyperOS 3 आहे.
Maharashtra Rain Update : पुढील 2 दिवस राज्यात मुसळधार पाऊस, ‘या’ जिल्ह्यांसाठी अर्लट जारी
दोन्ही फोनमध्ये चार 50-मेगापिक्सेल कॅमेरे आहेत. रिअर कॅमेऱ्यांमध्ये Leica ब्रँडिंग आहे. Xiaomi 17 Pro मध्ये 6,300mAh बॅटरी आहे, तर Pro Max मध्ये 100W चार्जिंग सपोर्टसह 7,500mAh बॅटरी आहे.