Download App

Google Pay द्वारे रिचार्ज करणार असाल तर सावधान; आता अतिरिक्त पैसे द्यावे लागतील

Google Pay : गुगल पेद्वारे अनेकांना मोबाईल रिचार्ज करण्याची सवय लागली आहे. UPI द्वारे कोणताही रिचार्ज प्लॅन पाहिला जातो आणि काही सेकंदात पेमेंट केले जाते. लोक इतर अॅप्सपेक्षा Google Pay चा जास्त वापर करत होते कारण हे पेमेंट अॅप कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारत नव्हते. म्हणजेच रिचार्ज प्लॉनसाठी जेवढे पैसे द्यावे लागतील तेवढे पैसे खात्यातून कट केले जात होते. पण आता याच गुगल पेने अनेकांची निराशा केली आहे.

Google Pay चे नवीन धोरण
आता जेव्हा तुम्ही तुमचा प्रीपेड फोन रिचार्ज कराल तेव्हा तुम्हाला अतिरिक्त शुल्क भरावे लागेल. तांत्रिक भाषेत त्याला सुविधा शुल्क (convenience fees) म्हणतात. असे सांगितले जात आहे की फोन रिचार्जसाठी Google Pay वरुन UPI द्वारे पेमेंट केले जाईल तेव्हा दोन ते तीन रुपये अतिरिक्त द्यावे लागतील. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लोकांनी स्वतः या नवीन पॉलिसीबद्दल सांगितले आहे.

Rajasthan Election : उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद, काँग्रेस जादुई आकडा पार करेल, गेहलोतांचा दावा

किती अतिरिक्त पैसे लागतील?
अनेकांनी ट्विट करून माहिती दिली आहे की जर 200 रुपयांपेक्षा कमी रिचार्ज असेल तर कोणतेही अतिरिक्त शुल्क नाही, परंतु 200 रुपयांच्या वर प्लॅन होताच 2 ते 3 रुपयांपर्यंत अतिरिक्त शुल्क भरावे लागेल. पेटीएम आणि फोन पे हे अतिरिक्त शुल्क आधीच आकारत होते, परंतु आता Google Pay देखील त्याच धोरणाने पुढे गेले आहे.

महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणात नवा ट्विस्ट; कुरिअर बॉयने ईडीवरच केले आरोप

लोकांमध्ये नाराजी
Google Pay ने अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केली नसली तरी, त्याच्या नियम आणि शर्तींमध्ये Google फी नमूद करण्यात आली आहे. येत्या काही दिवसांत या अतिरिक्त शुक्लांचीही घोषणा होणार असल्याचे जाणकारांचे मत आहे. या नव्या धोरणाबाबत लोकांमध्ये नाराजी आहे. अनेकांचे म्हणणे आहे की ते फक्त Google Pay वापरत होते कारण त्यांना तेथे जास्तीचे शुल्क भरावे लागत नव्हते. मात्र येत्या काळात हा ट्रेंड बदलणार आहे.

Tags

follow us