Rajasthan Election : उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद, काँग्रेस जादुई आकडा पार करेल, गेहलोतांचा दावा

  • Written By: Published:
Rajasthan Election : उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद, काँग्रेस जादुई आकडा पार करेल, गेहलोतांचा दावा

Rajasthan Election 2023 Voting : राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी (Rajasthan Assembly Elections) आज मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी 200 पैकी 199 मतदारसंघात मतदान झाले. गेल्या काही दशकांत परंपरेने हरएक विधानसभा निवडणुकीत राज्यातील सरकार बदलत आले. मात्र, राजस्थानचे विद्यमान मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांनी यावेळी राजस्थानमध्ये कल बदलेल आणि राज्यात काँग्रेसचे सरकार स्थापन होईल, असा दावा केला आहे.

शेंडगे-भुजबळांनी माझ्या नादी लागू नये, तुम्ही कधीही मंडल बरोबर नव्हता 

राजस्थानच्या दिग्गजांसाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. विद्यमान मुख्यमंत्री अशोक गेहलोत, माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे, सचिन पायलट, राज्यवर्धन सिंह राठोड आणि दिया कुमारी यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांचे भवितव्य आज मतपेटीत बंद झाले आहे.

किती टक्के झाले मतदान?
निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत राज्यात 68.24 टक्के मतदान झाले आहे. राज्यातील सर्वात जास्त मतदान जैसलमेर जिल्ह्यात सुमारे 76.6 टक्के आणि सर्वात कमी पाली जिल्ह्यात 60.7 टक्के मतदान झाले.मतदानासाठी राज्यात एकूण 51,890 मतदान केंद्रे उभारण्यात आली होती. मिळालेल्या माहितीनुसार, या निवडणुकीत 5 कोटी 26 लाख 90 हजार 146 मतदारांनी 1862 उमेदवारांचे भवितव्य ठरवले आहे.

NCP Political Crisis: बेगडी प्रेम दाखवू नका, वैर घ्यायचे तर समोरासमोर…जितेंद्र आव्हाडांचे तटकरेंना खुले चँलेज 

काँग्रेस 100 चा जादुई आकडा पार करेल- गेहलोत
दरम्यान, मतदान झाल्यानंतर अशोक गेहलोत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, 1998 च्या विधानसभा निवडणुकीपासून राजस्थानचे मतदार दर पाच वर्षांनी सत्ताबदल करतांना दिसतात. एकदा भाजप, तर एकदा काँग्रेसचे सरकार येणार आहे. आता 200 जागांच्या विधानसभेत काँग्रेस 100 चा जादुई आकडा पार करेल. यंदा प्रथा बदलणार आणि कॉंग्रेसचं सरकार येणार, असा दावा त्यांनी केला.

काँग्रेसचा विजय होईल – सचिन पायलट
दरम्यान, राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान केल्यानंतर काँग्रेसचाच विजय होईल, असा विश्वास काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी व्यक्त केला आहे. ते म्हणाले, मला आशा आहे की, 3 डिसेंबरला काँग्रेसला बहुमत मिळेल.

2013 च्या निवडणुकीत वसुंधराराजे शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने निर्णायक विजय मिळवला होता. यानंतर, 2018 मध्ये अशोक गेहलोत यांना अपक्ष आणि छोट्या पक्षांकडून महत्त्वपूर्ण पाठिंबा मिळविण्यासाठी चांगलाच संघर्ष करावा लागला. दरम्यान, यंदा मतदार कोणाच्या बाजूने कौल देणार हे 3 डिसेंबर रोजी मतमोजणीच्या दिवशी कळेल.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube