शेंडगे-भुजबळांनी माझ्या नादी लागू नये; ओबीसी आरक्षणावरुन आंबेडकरांचा हल्लाबोल

शेंडगे-भुजबळांनी माझ्या नादी लागू नये; ओबीसी आरक्षणावरुन आंबेडकरांचा हल्लाबोल

Prakash Ambedkar on Chhagan Bhujbal : आता आरक्षणावरुन वाद सुरु आहे. ओबीसीच्या (OBC) नेत्यांनी माझ्या नादी लागू नये. आरक्षणाचा इतिहास काढला तर तुम्ही मंडल बरोबर नव्हता तर कमंडल बरोबर होतात. मग ते शेंडगे असतील किंवा भुजबळ (Chhagan Bhujbal) असतील. जनता दलासोबत ओबीसीचे आरक्षण मिळवणारे आम्हीच आहोत. त्या अगोदर जनता पार्टीबरोबर. आता असणारे वाचवता येत नाही म्हणून भेडवण्याची भाषा आहे, असा हल्लाबोल वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केला.

ते पुढं म्हणाले की दुर्दैवाने इथल्या सरकारने विकासाच्या योजना आखल्या नाहीत. म्हणून विकास करायचा असेल तर आरक्षण हाच एकमेव मार्ग आहे असा समज झाला आहे. आरक्षण हा विकास नाही तर आरक्षण हे प्रतिनिधीत्व आहे. शिवाजी महाराजांचा काळखंड सोडला तर राजे, महाराजांच्या काळात आदिवासी, दलित, ओबीसींना दरबारात चोपदार देखील होण्याचा अधिकार नव्हता. उद्याच्या लोकशाहीत हे लोक बाहेर राहू नयेत म्हणून त्यांच्या प्रतिनिधित्वासाठी आरक्षण आलं, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्यांनाच बदलू, सुजात आंबडेकरांचा मोदी-भाजपवर हल्लाबोल

गेल्या नऊ वर्षात 60 ठिकाणी सरकारी धडी पडल्या आहेत. ज्यांच्यावर धाडी पडल्या, चौकशी झाली पण कोर्टात उभा केलं नाही. त्यांना लटकवत ठेवलं आहे. हे भिती निर्माण करण्यासाठी केलं जात आहे. यातून व्यवस्था काबीज करण्याचा प्रयत्न आहे. जनतेने सरकारला विचारले पाहिजे की तुम्ही त्यांच्यावर धाडी टाकल्या पण केस का केल्या नाहीत? ज्याच्यावर धाडी टाकल्या त्याला सांगायचे की तु आमच्याविरोधात बोलत नाहीस तोपर्यंत जिवंत आहेस. आमच्या विरोधात बोलला की तुला जेलमध्ये टाकू, हे राजकारण सुरु आहे, असा हल्लाबोल प्रकाश आंबेडकर यांनी केला.

भुजबळांच्या भूमिकेवर अजित पवार प्रथमच बोलले, वाचळवीरांना दिला महत्त्वाचा सल्ला

लोकांना भडकावणाऱ्या संघटना बऱ्याच आहेत. अशा नेत्यांनी अगोदर त्यांची मुलं पुढं करावीत मग लोकांना बोलावं. स्वत:चे कुटुंब सुरक्षित ठेवायचं, स्वत:ला इजा होऊ द्यायची नाही पण इतरांना इजा झाली तरी चालेल, अशा लोकांपासून सावध राहिले पाहिजे, अशी टीक प्रकाश आंबेडकर यांनी केली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube