कोचीनमधील टेक-फेस्टमध्ये चेंगराचेंगरी, चार विद्यार्थ्यांचा मृत्यू, लाइव्ह कॉन्सर्टमध्ये गेले जीव

  • Written By: Published:
कोचीनमधील टेक-फेस्टमध्ये चेंगराचेंगरी, चार विद्यार्थ्यांचा मृत्यू, लाइव्ह कॉन्सर्टमध्ये गेले जीव

कोचीन: कोचीन युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजीच्या टेक-फेस्टमध्ये ( Cochin University of Science And Technology) शनिवारी रात्री मोठी दुर्घटना घडली. निखिता गांधीच्या (Nikhita Gandhi) यांच्या गाण्याच्या कॉन्सर्टदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत चार विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. तर 60 हून अधिक विद्यार्थी हे जखमी झाले आहेत. त्यातील काही जण हे गंभीर जखमी असल्याचे वृत्त आहे.

शेंडगे-भुजबळांनी माझ्या नादी लागू नये; ओबीसी आरक्षणावरुन आंबेडकरांचा हल्लाबोल

एर्नाकुलम येथील इंजिनिनियरिंग कॉलेजमध्ये वार्षिक स्नेहसंमेलनादरम्यान टेक फेस्टचे आयोजन करण्यात आले होते. गायिका निखिता गांधीचा कॉन्सर्ट सुरू होता. यावेळी जोरदार गर्दी झालेली होती. त्याचवेळी काही विद्यार्थी पायऱ्यांवरून खाली पडले. त्यामुळे जोरदार गोंधळ उडाला. त्यात चेंगराचेंगरी होऊन अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत. त्यातील चार जणांचा मृत्यू झाला आहे. जखमी विद्यार्थ्यांना जवळच्या सरकारी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणाची पोलीस चौकशी करत आहे. सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये आणलेल्या चार विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती केरळच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी जाहीर केले आहे.

एर्नाकुलमचे जिल्हाधिकारी एनएसके उन्मेष यांनीही याबाबत माहिती दिली आहे. दोन विद्यार्थी हे गंभीर जखमी आहेत.मृतांपैकी तिघांची ओळख पटली आहे. अतुल थम्पी (रा. कुथाट्टुकुलम), अनरुफ्था (रा. उत्तरपरावूर), सारा थॉमस (रा. थामरसेरीची) असे त्यांचे नावे आहेत. तिघेही केरळमधील रहिवाली आहे. तर चौथ्या मृताची अद्याप ओळख पटलेली नाही.


भुजबळांच्या भूमिकेवर अजित पवार प्रथमच बोलले, वाचळवीरांना दिला महत्त्वाचा सल्ला

नेमकी काय घडले ?

गाण्यांचा कार्यक्रम सुरू असताना भरपूर गर्दी झाली होती. त्यात बाहेरच्या कॉलेजचे विद्यार्थीही सहभागी झाले होते. त्याचवेळी जोराचा पाऊस सुरू झाला. पावसापासून बचाव करण्यासाठी विद्यार्थी ही ऑडिटियरममध्ये जात होते. त्याचवेळी गोंधळ उडून चेंगराचेंगरी झाली आहे. काही विद्यार्थी पायऱ्यावरून पाय घसरून पडले. त्यात काही विद्यार्थी त्यांच्यावर पडले असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात येत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube