संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्यांनाच बदलू, सुजात आंबडेकरांचा मोदी-भाजपवर हल्लाबोल

  • Written By: Published:
संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्यांनाच बदलू, सुजात आंबडेकरांचा मोदी-भाजपवर हल्लाबोल

Sujat Ambedkar : पंतप्रधान नरेंद्र मोद (Prime Minister Narendra Modi)देशाची अर्थव्यवस्था भांडवलदार अदानी आणि अंबानींना विकण्याचा प्रयत्न करत आहेत. सरकारी नोकऱ्यांमध्ये कंत्राटीकरण केलं जातंय. भाजप, आरएसएसवाले संविधान बदलण्याची भाषा करतात. मात्र, त्याविरोधात वंचित समाजाचा लढा सुरूच राहील.  जो संविधान बदले की बाद करेगा, हम उसकोही बदल देंगे, असा इशारा (Sujat Ambedkar) यांनी दिली.

भुजबळांच्या भूमिकेवर अजित पवार प्रथमच बोलले, वाचळवीरांना दिला महत्त्वाचा सल्ला 

संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये संविधान सन्मान महासभेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी सुजात आंबेडकर बोलत होते. सुजात यांनी भारतीय संविधानाच विजय असो, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, अशा घोषणा देत आपल्या भाषणाला सुरुवात केली. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, आज वंचित-बहुजन समाजातील तरुण सर्वच क्षेत्रात वावरतांना दिसतो. हे शक्य झालं, ते फक्त संविधाामुळं आणि संविधााने दिलेल्या संरक्षणामुळं. मात्र, आता संविधान बलण्याची भाषा केली जाते. मात्र, संविधान बदलणं कुणालाही शक्य नाही, असं सुजात यांनी ठणकावलं.

स्पॉट फिक्सिंगनंतर एस श्रीशांत पुन्हा अडचणीत; केरळ पोलिसांकडून गुन्हा दाखल 

ते म्हणाले, भाजप, मोदी, शहा किंवा आरएसएसवाले असतील, हे दिसतात तितके साधे नाहीत. ते संविधान थेट बलदणार नाही. ते उंदरासाखं संविधान कुरतुडून टाकतील, त्यामळं आपण सजग असणं गरजेचं आहे. आज सगळीकडे कंत्राटीकरण सुरू आहे. झेडीच्या शाळा बंद पाडल्या जातात. खाजगी शाळांना प्रोत्साहन दिलं जातं. बार्टी, सारथी , युजीसी या संस्थांचे अनुदान कमी करून बदं त्या संस्था बंद पाडण्याचे प्रयत्न केले जात आहे. शिक्षणाचे मार्ग बंद केले जात आहे. मोदी हे आपला देश विकायला निघाले. त्यांनी देश अदानींच्या दावणीला बांधला. दूरसंचार, एअर इंडियाचे खाजगीकरण केले. वर्ग I पासून सर्व भरती कंत्राटी पद्धतीने केले जात आहे. रेल्वे, आरोग्य, समाजकल्याण या महत्त्वाच्या सरकारी खात्यांचे खासगीकरण केले जात आहे. महत्वाच्या संस्था भांडवलदारांच्या घशात घातल्या जात आहे. त्या सरकारच्या मालकीचे नसतील तर आरक्षणाला काही अर्थ उरणार नाही. याविरुध्द लढण्याची गरज आहे. मात्र, हा घाबण्याचा काळा किंवा गप्प बसण्याचा काळ नाही.

येत्या प्रत्येक निवडणुकीत सरपंच, नगरसेवक, आमदार, खासदार हे बहुजन समाजातले लोकप्रतिनिधी देऊ, जे संविधानाचा सन्मान करतील. कारण, जो संविधान बदले की बाद करेगा, आपण उसकोही बदल देंगे, असा इशारा सुजात यांनी दिला.

 

 

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज