स्पॉट फिक्सिंगनंतर एस श्रीशांत पुन्हा अडचणीत; केरळ पोलिसांकडून गुन्हा दाखल

स्पॉट फिक्सिंगनंतर एस श्रीशांत पुन्हा अडचणीत; केरळ पोलिसांकडून गुन्हा दाखल

कोच्ची : टीम इंडियाचा (India) पूर्वाश्रमीचा वेगवान गोलंदाज एस. श्रीशांत (S.Sreesanth) पुन्हा अडचणीत आला आहे. केरळ पोलीसांनी एस. श्रीशांतसह राजीव कुमार आणि व्यंकटेश किणी या तिघांविरोधात अशा फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. कन्नूर जिल्ह्यातील सरिश गोपालन यांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 420 अंतर्गत हा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात श्रीशांतला तिसरा आरोपी बनवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. (fraud case has been filed against Team India’s former fast bowler S.Sreesanth)

क्रिकेट अकादमीशी संबंधित प्रकरण :

कन्नूर जिल्ह्यातील चुंदा येथील सरिश गोपालन यांनी या प्रकरणात तक्रार दाखल केली आहे. कर्नाटकातील कोल्लूर येथे स्पोर्ट्स अकादमी स्थापन करणार असल्याचे सांगून आरोपी राजीव कुमार आणि व्यंकटेश किणी यांनी 25 एप्रिल 2019 पासून आतापर्यंत सरिश गोपालन यांच्याकडून एकूण 18.70 लाख रुपये घेतले. याच अकादमीमध्ये श्रीशांत देखील भागीदार असणार आहे, असा दावा राजीव कुमार आणि किणी यांनी केला होता. अकादमीमध्ये भागीदार होण्याची संधी मिळाल्यानंतर ही रक्कम गुंतवल्याचे गोपालन यांनी तक्रारीत म्हटले आहे.

आशिया कपसाठी भारतीय संघाची घोषणा; नाशिक अन् बीडचे शिलेदार करणार देशाचे प्रतिनिधित्व

एस. श्रीशांतवर बंदी घालण्यात आली होती

एस. श्रीशांत याआधीही वादात सापडला आहे. आयपीएल 2013 मध्ये कथित स्पॉट फिक्सिंगप्रकरणात एस. श्रीशांतवर आजीवन बंदी घालण्यात आली होती. पण 2020 मध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या लोकपालन समितीने त्याच्यावरील बंदी सात वर्षांपर्यंत कमी केली होती. यानंतर केरळसाठी देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यात श्रीशांतला यश आले आहे. सध्या श्रीशांत लिजेंड्स लीग क्रिकेट (LLC) 2023 मध्ये खेळत आहे.

Imad Wasim : पाकिस्तानला धक्का! वर्ल्डकपनंतर ‘या’ अष्टपैलू खेळाडूने घेतली अचानक निवृत्ती

श्रीशांत दोन्ही वर्ल्डकप विजयी संघाचा भाग :

एस. श्रीशांत 2007 टी-20 आणि 2011 एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या विजयी भारतीय संघाचा भाग होता. श्रीशांतने भारतासाठी 27 कसोटी, 53 एकदिवसीय आणि 10 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. या काळात त्याने एकूण 169 विकेट घेतल्या.

एस श्रीशांतने किंग्ज इलेव्हन पंजाब (आता पंजाब किंग्ज) कडून आयपीएल पदार्पण केले. यानंतर त्याने कोची टस्कर्स आणि राजस्थान रॉयल्स (RR) संघांकडून खेळला. श्रीशांतच्या नावावर 44 आयपीएल सामन्यांमध्ये 29.9 च्या सरासरीने 40 विकेट आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube