आशिया कपसाठी भारतीय संघाची घोषणा; नाशिक अन् बीडचे शिलेदार करणार देशाचे प्रतिनिधित्व

आशिया कपसाठी भारतीय संघाची घोषणा; नाशिक अन् बीडचे शिलेदार करणार देशाचे प्रतिनिधित्व

मुंबई : अंडर-19 आशिया कप 2023 साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. शनिवार (25 नोव्हेंबर) रोजी बीसीसीआयच्या कनिष्ठ क्रिकेट निवड समितीने 15 सदस्यांची यादी जाहीर केली. UAE मध्ये खेळल्या जाणाऱ्या अंडर-19 आशिया चषक स्पर्धेत उदय सहारन भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. तर सौम्य कुमार पांडे उपकर्णधार असणार आहे. (Indian squad for the U-19 Asia Cup 2023 announced)

उदय सहारन हा राजस्थानचा रहिवासी असून मागील अंडर-19 विश्वचषकादरम्यान त्याची स्टँडबाय म्हणून निवड करण्यात आली होती. याच यादीत नाशिकच्या अर्शिन कुलकर्णी आणि बीडच्या सचिन धस यांनाही संधी मिळाली आहे. निवडकर्त्यांनी तीन खेळाडूंची प्रवास स्टँडबाय म्हणून निवड केली आहे. याशिवाय चार खेळाडू राखीव म्हणून राहणार आहेत. राखीव खेळाडू संघासोबत प्रवास करणार नाहीत.

तिरुअनंतपुरममध्ये भारत कांगारुंशी भिडणार, जाणून घ्या पिच रिपोर्ट…

आशिया कपसाठी भारताचा अंडर-19 संघ: अर्शिन कुलकर्णी, आदर्श सिंग, रुद्र मयूर पटेल, सचिन धस, प्रियांशू मोलिया, मुशीर खान, उदय सहारन (कर्णधार), अरावेली अवनीश राव (यष्टीरक्षक), सौम्य कुमार पांडे (उपकर्णधार) ), मुरुगन अभिषेक, इनेश महाजन (यष्टीरक्षक), धनुष गौडा, आराध्या शुक्ला, राज लिंबानी, नमन तिवारी.

प्रवासी स्टँडबाय खेळाडू : प्रेम देवकर, अंश गोसाई, मोहम्मद अमन.

राखीव खेळाडू : दिग्विजय पाटील, जयंत गोयत, पी. विघ्नेश, किरण चोरमले

आशिया चषक 8 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेतील भारताचा पहिला सामना 8 डिसेंबर रोजी अफगाणिस्तानशी होणार आहे. त्यानंतर 10 डिसेंबरला भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी सामना होईल. भारतीय संघ 12 डिसेंबरला नेपाळशी भिडणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना 17 डिसेंबर रोजी दुबई येथे खेळवला जाणार आहे.

Imad Wasim : पाकिस्तानला धक्का! वर्ल्डकपनंतर ‘या’ अष्टपैलू खेळाडूने घेतली अचानक निवृत्ती

19 वर्षांखालील विश्वचषक 2024 साठी आशिया चषक महत्त्वाचा मानला जात आहे. आगामी अंडर-19 विश्वचषक जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर खेळवला जाणार आहे. भारतीय संघ अंडर-19 विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहे. टीम इंडियाने 2000, 2008, 2012, 2018 आणि 2022 मध्ये अंडर-19 वर्ल्ड कपवर कब्जा केला होता. याशिवाय 2016 आणि 2020 मध्ये भारत उपविजेता ठरला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube