पायलट नरेंद्र मोदी! पंतप्रधानांनी बंगळुरुत घेतला लढाऊ विमान उड्डाणाचा अनुभव

पायलट नरेंद्र मोदी! पंतप्रधानांनी बंगळुरुत घेतला लढाऊ विमान उड्डाणाचा अनुभव

बंगळुरु : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी बंगळुरूमध्ये (Bangalore) तेजस (Tejas Aircraft) या लढाऊ विमानाच्या उड्डाणाचा अनुभव घेतला. त्यांनी शनिवारी (25 नोव्हेंबर) बंगळुरूत हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) च्या फॅसिलिटीला भेट दिली. यावेळी त्यांनी तेजस विमानातून आकाशात फेरफटका मारला. यानंतर त्यांनी त्यांचा अनुभव ‘एक्स’वर शेअर केला आहे. पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी तेजस जेटच्या मॅन्युफॅक्चरिंग हबची पाहणी करण्यासाठी गेले होते. (Prime Minister Narendra Modi experienced the flight of the Tejas fighter jet in Bangalore.)

एक्सवर पंतप्रधान मोदी म्हणाले, “तेजसमधून यशस्वी उड्डाण केले. हा अनुभव समृद्ध अन् आश्चर्यचकीत करणारा होता. यामुळे आपल्या देशाच्या क्षमतेवरचा विश्वास आणखी वाढला. माझ्या मनात देशाच्या क्षमतेबद्दल अभिमान आणि नवी आशा निर्माण झाली. भारतीय वायुसेना, DRDO आणि HAL तसेच सर्व भारतीयांचे मनःपूर्वक अभिनंदन.” मोदी सरकार मागील काही वर्षांपासून संरक्षण उत्पादनांच्या स्वदेशी उत्पादनावर भर देत आहे. भारतात संरक्षण उपकरणांच्या निर्मिती आणि निर्यातीला कशाप्रकारे प्रोत्साहन दिले जात आहे, याबद्दल सरकारने अनेकदा अधोरेखित केले आहे.

630 कोटींच्या लॉस, Paytm मधून बाहेर पडला जगातला सर्वात मोठा इव्हेस्टर

 तेजस खरेदी करण्यासाठी अनेक देशांची इच्छा :

अनेक देशांनी तेजस हलके लढाऊ विमान खरेदी करण्यात स्वारस्य दाखवले आहे. पंतप्रधानांच्या अमेरिका दौऱ्यात यूएस डिफेन्स कंपनी GE एरोस्पेसने MK-II तेजससाठी संयुक्तपणे इंजिन तयार करण्यासाठी HAL सोबत करार केला होता. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या वर्षी एप्रिलमध्ये म्हटले होते की, 2022-2023 या आर्थिक वर्षात भारताच्या संरक्षण निर्यातीने 15,920 कोटी रुपयांचा उच्चांक गाठला आहे. देशासाठी ही उल्लेखनीय कामगिरी असल्याचे ते म्हणाले होते.

Rakhi Sawant: ‘ड्रामा क्वीन’ राखी सावंतचं खरं नाव ठाऊक आहे? पाळण्यात आईने ठेवलेलं भलतंच नाव…

तेजसची वैशिष्ट्ये काय आहेत?

तेजस हे स्वदेशी हलके लढाऊ विमान आहे जे कोणत्याही हवामानात उडू शकते. हे दोन पायलट असलेले लढाऊ विमान आहे. त्याला लिफ्ट म्हणजेच लीड-इन फायटर ट्रेनर म्हणतात. याला ग्राउंड अटॅक एअरक्राफ्ट असेही म्हणतात, म्हणजे गरज पडल्यास त्यावर हल्ला केला जाऊ शकतो. हवाई दलाने एचएएलकडून 123 तेजस विमानांची ऑर्डर दिली असून, त्यापैकी 26 विमाने देण्यात आली आहेत. हे सर्व तेजस मार्क-1 आहेत. येत्या काही दिवसांत, एचएएल या विमानांच्या अधिक श्रेणीसुधारित आवृत्त्या हवाई दलाला सुपूर्द करेल, 2024 ते 2028 दरम्यान ते वितरित केले जातील.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज