देशभरात अनेक ठिकाणी नुकताच गिग वर्कचा 31 डिसेंबरला संप झाला. (Zomato) त्यामुळे नववर्षांचे स्वागत करताना काही मेट्रो शहरात अडचणीही निर्माण झाल्या. परंतु अवघ्या काही मिनिटात डिलिव्हरी देणाऱ्या आणि उन्हा पावसात गाडी दामटवत घराघरात वस्तू आणि खाद्यपदार्थ वेळेत पोहचवणाऱ्या या गिग वर्कर्सना किती पगार मिळतो याचा विचार कधी केला आहे का?
केवळ दहा मिनिटात वस्तू पोहचवण्यात आपल्या प्राणांची बाजी लावणाऱ्या या गिग वर्कर्सच्या कमाई संदर्भात Zomato आणि Blinkit यांचे सीईओ दीपेंद्र गोयल यांनी खुलासा केला आहे. नेहमीच चर्चा सुरु असते की डिलिव्हरी पार्टनर्सची कमाई किती असते ही कमाई पहिल्या ऑफीसच्या नोकरीपेक्षा जास्त असते का? असा सवाल सर्वसामान्यांच्या मनात आहे. दीपेंद्र गोयल यांनी दिलेल्या आकडेवारवर नजर टाकली तर आश्चर्यकारक माहिती मिळते. साल 2025 मध्ये Zomato च्या डिलिव्हरी पार्टनर्सला प्रति तास सरासरी कमाई (EPH) 102 रुपये होती. जी गेल्या वर्षांच्या तुलनेत 11% जास्त होती.
खास म्हणजे ही कमाई केवळ ऑर्डर डिलिव्हरी करण्याचा वेळेची नसून त्याऐवजी लॉग-इन राहणे आणि ऑर्डरची वाट पाहाण्याचा वेळ मिळून काढण्यात आली आहे. गोयल यांनी कमाई संदर्भात आणखी माहिती देताना सांगितलं की, जर एखादा व्यक्ती महिन्यातील 26 दिवस काम करत असेल आणि रोज 10 तास लॉग इन रहात असेल तर त्याचे एकूण मासिक उत्पन्न (Gross Income) सुमारे 26,500 रुपये होऊ शकते. मात्र, यात पेट्रोल आणि बाईकच्या देखभालीच्या खर्चाचाही समावेश आहे. जर हे खर्च गृहीत धरले तर 20 टक्के कपात करावी लागेल. म्हणजे हातात येणारी खरी कमाई (Net Income) सुमारे 21,000 रुपये उरते. हा आकडा अनेक एण्ट्री लेव्हलच्या नोकरी किंवा त्यापेक्षा बरा म्हणावा असा आहे.
कमाईत Swiggy, Zomato डिलिव्हरी बॉईज पुढे; आयटी कंपन्यांच्या फ्रेशर्सपेक्षा जास्त पगार
तुम्हाला वाटत असेल की डिलिव्हरीचे काम या तरुणांचा कमाईचा एकमेव मार्ग आहे. परंतू डेटानुसार तसं नाही. कंपनीने दावा केला आहे की बहुतांश पार्टनर्स यास फूल टाईम नोकरी म्हणून करत नाहीत. पार्ट टाईम किंवा त्यांच्या मर्जीनुरुप करतात. वर्षभरात सरासरी एका पार्टनरने केवळ 38 दिवस काम केले आहे.केवळ 2.3% लोक असे आहेत ज्यांनी वर्षभरात 250 दिवसांपेक्षा जास्त काम केले आहे. म्हणजे हे काम लवचिकपणे चालते. येथे कोणतीही निश्चित शिफ्ट वा बॉस नसतो. ग्राहकांद्वारा देण्यात येणाऱ्या टिपवर गोयल म्हणाले की अनेकांना वाटते टिपचे पैसे कंपनी जवळ ठेवते. परंतू टिपचे संपूर्ण पैसे हे डिलिव्हरी पार्टनरला दिले जाते.
भारतीय ग्राहक टिप देण्यात थोडे कंजूस आहेत. ब्लिंकिटवर केवळ 2.5% आणि झोमॅटोवर 5% ऑर्डरवर टिप दिली जाते. सरासरी एका तासात टिपमधून होणारी कमाई केवळ 2.6 रुपये आहे. सर्वात मोठा वाद ‘क्विक कॉमर्स’ म्हणजे 10 मिनिटांच्या डिलिव्हरीवरुन सुरु आहे.यामुळे रायडर्सना वेगाने गाडी चालवण्याचा दबाव असतो. परंतू यावर स्पष्टीकरण देताना झोमॅटोच्या प्रमुखाने सांगितले की डिलिव्हरीच्या वेळेचा संबंध गाडीच्या वेगाशी नाही. तर स्टोअरचे लोकेशन आणि लॉजिस्टीक्सशी आहे. ब्लिंकीटवर डिलिव्हरीसाठी निश्चित केलेले सरासरी अंतर केवळ 2.03 किलोमीटर असते. ज्यास पूर्ण करण्यास 8 मिनिट्स लागतात. यावेळी सरासरी वेग 16 किलोमीटर प्रति तास असतो. जो शहरातील ट्रॅफीकच्या तुलनेत खुप सुरक्षित मानला जाऊ शकतो.
