कमाईत Swiggy, Zomato डिलिव्हरी बॉईज पुढे; आयटी कंपन्यांच्या फ्रेशर्सपेक्षा जास्त पगार

कमाईत Swiggy, Zomato डिलिव्हरी बॉईज पुढे; आयटी कंपन्यांच्या फ्रेशर्सपेक्षा जास्त पगार

Infosys : आपल्या देशात आता ऑनलाईन पद्धतीने जेवण ऑर्डर करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. आज देशात मोठ्या प्रमाणात ब्लिंकिट (Blinkit), झेप्टो (Zepto), स्विगी (Swiggy) आणि झोमॅटो (Zomato) सारख्या प्लॅटफॉर्मवरुन अनेकांची जेवण्याची सोय होत आहे. या प्लॅटफॉर्मवरुन आपण काही ऑर्डर केल्यानंतर अगदी काही मिनिटांमध्ये डिलव्हरी एजंट आपले ऑर्डर घेऊन येतात. तर आता या डिलव्हरी एजंटच्या कमाईबाबत एक आहवालसमोर आला आहे. ज्याची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा होता दिसत आहे.

मनीकंट्रोलच्या अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, ब्लिंकिट, झेप्टो, स्विगी आणि झोमॅटो सारख्या प्लॅटफॉर्मवरील डिलिव्हरी एजंट वर्षाला टीसीएस (TCS) आणि इन्फोसिससारख्या (Infosys) मोठ्या आयटी कंपन्यांच्या फ्रेशर्सपेक्षा जास्त कमाई करत आहे. या अहवालानुसार, टीसीएस आणि इन्फोसिससारख्या मोठ्या आयटी कंपन्यांमधील फ्रेशर्सना वार्षिक पगार सुमारे अडीच लाख ते पाच लाख रुपये असतो. तर डिलव्हीर एजंट वर्षाला तीन ते चार लाख रुपये कमवतो असा दावा या अहवालात करण्यात आला आहे. मात्र हे उत्पन्न पूर्णपणे त्यांच्या कामाचे तास, डिलिव्हर केलेल्या ऑर्डरची संख्या आणि मिळालेल्या प्रोत्साहनांवर अवलंबून आहे.

जास्त मेहनत करणारे आणि जास्त मागणी असलेल्या क्षेत्रात काम करणारे एजंट दरमहा 50 हजार रुपये किंवा त्याहूनही अधिक कमाई करू शकतात. असं या अहवालात म्हटले आहे.

मेहनतीनुसार कमाई

ब्लिंकिट, झेप्टो, स्विगी आणि झोमॅटो सारख्या प्लॅटफॉर्मवरील डिलिव्हरी एजंटचे उत्पन्न अनेक घटकांवर अवलंबून असते, ज्यामध्ये त्यांचे शहर देखील महत्त्वाची भूमिका बजावते. दिल्ली, मुंबई, बंगळुरू सारख्या मोठ्या शहरांमध्ये ऑर्डरची मागणी जास्त असते, त्यामुळे तेथील डिलिव्हरी एजंट्सचे उत्पन्न लहान शहरांपेक्षा खूप जास्त असू शकते.

तर दुसरीकडे डिलिव्हरी जॉब्समध्ये, ना आरोग्य विमा उपलब्ध असतो, ना पगारी रजा सारख्या सुविधा. आयटी कंपन्यांमध्ये पगार निश्चित असतो, तर डिलिव्हरी एजंट्सची कमाई दैनंदिन कामावर अवलंबून असते. जर दिवस चांगला गेला आणि जास्त ऑर्डर मिळाल्या तर उत्पन्न जास्त असते, परंतु जर ऑर्डर कमी असतील तर कमाई देखील कमी होते. म्हणूनच डिलिव्हरी एजंट्सच्या कमाईत स्थिरता नसते.

फ्री विमान प्रवास, खाजगी डॉक्टर अन् पेन्शन…, राजीनामा दिल्यानंतर जगदीप धनखडांना मिळणार अनेक सुविधा

आयटी जॉब्समध्ये अनेक फायदे

आयटी कंपन्यांमधील फ्रेशर्सना सुरुवातीला कमी पगार मिळू शकतो, परंतु त्यांना पीएफ, आरोग्य विमा, पगारी रजा आणि पदोन्नतीच्या संधी असे अनेक अतिरिक्त फायदे देखील मिळतात. हे फायदे दीर्घकाळात नोकरी स्थिर आणि सुरक्षित करतात. दुसरीकडे, डिलिव्हरी एजंट्स चांगले कमाई करू शकतात, परंतु आरोग्य विमा किंवा पगारी रजा सारख्या सुविधा सहसा त्यांच्या नोकऱ्यांमध्ये उपलब्ध नसतात. जरी आता काही कंपन्यांनी या सुविधा देण्यास सुरुवात केली असली तरी, फायद्यांच्या बाबतीत आयटी क्षेत्र अजूनही खूप पुढे आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube