Download App

राज्यात 202 साखर कारखाने होते मात्र आज 101 का राहिली ? उत्तर द्या, अमित शहांचा शरद पवारांना सवाल

Amit Shah Sangli Speech : सांगली लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीर

Amit Shah Sangli Speech : सांगली लोकसभा मतदारसंघात (Sangli Lok Sabha) महायुतीचे (Mahayuti) उमेदवार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांच्या प्रचारार्थ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी जाहीर सभा घेतली. या जाहीर सभेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

या सभेत अमित शहा म्हणाले, आतापर्यंत लोकसभा निवडणुकीच्या दोन टप्प्यासाठी मतदान पूर्ण झाला आहे. या दोन टप्प्यात एनडीए 100 पेक्षा जास्त जागा जिंकत आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. तर राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधत शहा म्हणाले, राहुल गांधी लोकांना चायनीज गॅरंटी देत आहे यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. काँग्रेसने राम मंदिराच्या निर्माणासाठी नेहमी विरोध केला मात्र मोदींनी 5 वर्षात राम मंदिर उभारले आणि मंदिर दर्शनासाठी खुले ही केले.

उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत अमित शहा म्हणाले, राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा बहिष्कार उद्धव ठाकरे, शरद पवार यांनी केला होता. नकली शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या जनते समोर स्पष्ट करावा की, सीएए लागू करण्याचा निर्णय योग्य होता का ? राम मंदिराचा निर्माण योग्य होता का ? हे तुम्ही आज जनतेसमोर स्पष्ट करावे अशी मागणी करत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. तर उद्धव ठाकरे या प्रश्नांचे उत्तर देणार नाही कारण त्यांना त्यांच्या नवीन वोट बँकेची काळजी आहे यामुळे ते पाकिस्तानचा विरोध देखील करणार नाही असं अमित शहा म्हणाले.

तर शरद पवार यांच्यावर टीका करत अमित शहा म्हणाले, राज्यात 202 साखर कारखाने होते मात्र आज 101 का राहिले? याचे शरद पवार यांनी उत्तर द्यावे राज्यात इतके साखर कारखाने बंद का झाले? पश्चिम महाराष्ट्र ऊसाचे क्षेत्र आहे तिकडून तुम्हाला लोकांनी नेहमी निवडून दिला आहे मात्र तुम्ही त्यांची काळजी घेतली नाही, राज्यात 34 जिल्हा बँका होते मात्र आता 3-4 का राहिले ? तुम्ही 10 वर्ष कृषी आणि सहकार मंत्री होते, तर चूक कुठे झाली याचा उत्तर शरद पवारांनी द्यावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

मोठी बातमी! कल्याणमध्ये ठाकरे बदलणार उमेदवार? माजी महापौरांचा अर्ज दाखल

जर कधी इंडिया आघाडीला बहुमत मिळाला तर त्यांच्या पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण होणार ? याचा विचार करून पुन्हा एकदा नरेंद्र मोदींना पंतप्रधान बनवण्यासाठी संजय मंडलिक यांना निवडून द्यावा असा आवाहन त्यांनी सभेत बोलताना केला.

follow us