लोकसभा निवडणुकीपूर्वीच CAA ची अंमलबजावणी होणार! अमित शहांची सर्वात मोठी घोषणा
नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वीच देशात नागरिकत्व दुरुस्ती कायदा अर्थात Citizenship Amendment Act लागू करण्यात येईल, आचारसंहिता घोषित होण्यापूर्वी त्याबाबतची अधिसूचना जारी केली जाईल, अशी मोठी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी केली. एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतमीध्ये शहा यांनी ही घोषणा केली. (Amit Shah has announced that the Citizenship Amendment Act will be implemented in the country before the Lok Sabha elections)
नागरिकत्व (सुधारणा) कायद्याबाबत अमित शाह म्हणाले की, 2019 मधील या कायद्यासंदर्भात नियम जारी केले जातील आणि लोकसभा निवडणुकीपूर्वी लागू केला जाईल. त्याबाबत कोणाच्याही मनात कसलाही संभ्रम असण्याचे कारण नाही. या कायद्याबद्दल आमच्या मुस्लिम बांधवांची दिशाभूल केली जात आहे आणि भडकवले जात आहे. हा कायदा केवळ पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशात छळ सहन करून भारतात आलेल्यांना हिंदूंना नागरिकत्व देण्यासाठी आहे. या कायद्यातून कोणाचेही भारतीय नागरिकत्व हिरावून घेतले जाणार नाही.
CAA का नोटिफिकेशन जल्द ही हो जाएगा। pic.twitter.com/pdQEsRSBCf
— Amit Shah (@AmitShah) February 10, 2024
आम्ही जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द केले आहे, त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला 370 तर राष्ट्रीय लोकशाही आघाडीला 400 हून अधिक जागा मिळतील याची आम्हाला खात्री आहे. केंद्रात सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होईल, असा विश्वास व्यक्त करत लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत कोणतीही शंका नाही, काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनाही पुन्हा विरोधी पक्षात बसावे लागेल हे लक्षात आले आहे, असा टोलाही शाह यांनी विरोधकांना लगावला.
जयंत चौधरी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकदल (आरएलडी), शिरोमणी अकाली दल (एसएडी) आणि इतर काही प्रादेशिक पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये सामील होण्याच्या चर्चा आहेत. याबाबत विचारले असता अमित शाह यांनी आणखी पक्ष सोबत येणार असल्याचे संकेत दिले. ते म्हणाले, की भाजपचा परिवारावर नियोजन विश्वास आहे.पण राजकारणात त्याचा अवलंब करत नाही. शिरोमणी अकाली दल सोबत येण्याच्या शक्यतेबद्दल पुन्हा विचारले असता शहा म्हणाले, ‘चर्चा सुरू आहे, मात्र काहीही ठरलेले नाही.