Download App

“पूर्वीचे ठाम अन् परखड राज ठाकरे शोधतोय…” : मनसेच्या महायुतीतील एन्ट्रीच्या चर्चांवर थोरातांची खोचक टीका

अहमदनगर : “ठाम आणि परखड भूमिका मांडणाऱ्या राज ठाकरे यांना आम्ही ओळखतो. पण अलिकडील काळात तसे राज ठाकरे (Raj Thackeray) सापडत नाहीत. ते जर सापडले तर आम्हाला सर्वाधिक आनंद होईल” असे म्हणत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या नव्या भूमिकेवर खोचक टोला लगावला. आगामी लोकसभा निवडणुकीत मनसेचा महायुतीमध्ये समावेश होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर थोरात यांनी अहमदनगरमध्ये बोलताना मत व्यक्त केले. (Congress leader Balasaheb Thorat Criticized on MNS President Raj Thackeray’s new role)

बाळासाहेब थोरात म्हणाले, राज ठाकरे हे अतिशय उत्कृष्ट नेते आहेत. राज्याच्या हिताच्या दृष्टीने ते नेहमी आपली भूमिका मांडत असतात, पण अलिकडील काळात त्यांच्या भूमिका कशा राहिल्या आहेत, हे आपण जाणून आहोत. ठाम आणि परखड भूमिका मांडणाऱ्या राज ठाकरे यांना आम्ही ओळखतो. तसे राज ठाकरे आता सापडत नाहीत. ते जर सापडले तर आम्हाला सर्वाधिक आनंद होईल, असाही टोला त्यांनी लगावला.

राज ठाकरे यांचा मोठा निर्णय! माजी आमदार परशुराम उपरकर यांच्यासह एका मनसैनिकाची हकालपट्टी

शिर्डी मनसेला सोडणार?

मनसेला महायुतीत कसे सहभागी करून घ्यायचे याचा खल सध्या भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेत सुरू आहे. मनसेशी अधिकृत युती करायला भाजपचा ठाम नकार आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांना राज ठाकरे यांची साथ आवश्यक वाटते. त्यातूनच मग शिर्डी लोकसभा मतदारसंघ मनसेकडे देण्यासाठीची खलबते सुरू आहेत. या मतदारसंघात मग महायुतीचा अधिकृत उमेदवार रिंगणात ठेवायचा नाही, अशी ही रणनीती आहे. त्याऐवजी भाजप- शिंदे गटाने मनसेला पाठिंबा द्यायचा, असे सारे गणित आहे. मग या मतदारसंघात मनसे विरुद्ध महाविकास आघाडी अशी मग लढत होऊ शकेल.

Rohit Pawar : “राज ठाकरेंचं आम्ही स्वागतच करू”; रोहित पवारांनी थेट ऑफरच दिली

मनसेकडून या मतदारसंघासाठी बाळ नांदगावकर यांचे नाव आघाडीवर आहे. राज यांचे निष्ठावान सैनिक म्हणून नांदगावकर यांची राज्यभर ओळख आहे. मुंबईतील माझगाव विधानसभा मतदारसंघात छगन भुजबळ यांचा १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत पराभव त्यांनी केला होता. त्यामुळे जायंट किलर म्हणूनही त्यांची ख्याती आहे. भाजप-शिवसेना युतीत गृहराज्यमंत्री म्हणूनही त्यांना संधी मिळाली होती. नांदगावकरांच्या रूपाने मनसेला पहिला खासदार मिळू शकतो, अशी आशा मनसैनिकांना आहे.

follow us