Download App

ठाकरेंसमोर काँग्रेस नतमस्तक, घरचा आहेर देत निरूपम यांनी दिले ‘जय महाराष्ट्र’ करण्याचे संकेत

  • Written By: Last Updated:

मुंबई : एकीकडे लोकसभेसाठी उमेदवारांच्या नावांची घोषणा होत असतानाच काँग्रसमधील अंतर्गत धुसफूस समोर येण्यास सुरूवात झाली आहे. ठाकरे गटासमोर काँग्रेस झुकली असल्याचा जाहीर आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संजय निरूपम (Sanjay Nirupam) यांनी केला आहे. तसेच अमोल कीर्तिकरांसाठी आपण काम करणार नसून, आठवडाभर पक्षातील वरिष्ठ नेते काय भूमिका घेता याची वाट बघणार असून, अन्यथा मी वेगळा निर्णय घेणार असल्याचे संकेत निरूपम यांनी दिले आहेत. माझ्यासमोर अनेक पर्याय खुले असल्याचेही यावेळी निरूपम यांना सांगितले आहे. त्यामुळे काँग्रेसचा हात सोडत निरूपम कमळ हातात घेणार की धनुष्यबाण हाती घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (Sanjay Nirupam Says All Options Are Open For Me)

मोठी बातमी : आंबेडकरांनी मोठा डाव टाकला; ‘मविआ’ शी काडीमोड, लोकसभा स्वतंत्र लढवण्याची घोषणा

निरूपण म्हणाले की, माझ्या समोर पर्याय नाही अशी स्थिती अजिबात नसून, आता जे काही होईल ते आर-पार होईल. साधारण येत्या आठवडाभरात महत्त्वाची घोषणा ऐकण्यास मिळेल असे सूचक विधानही निरूपम यांनी केले आहे. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने अमोल कीर्तिकर यांना उत्तर पश्चिम मुंबईतून तिकीट दिल्याने काँग्रेस नेते संजय निरुपम संतापले आहेत. त्यानंतर खिचडी चोर उमेदवारासाठी काम करण्याची मला अजिबात इच्छा नाही. कॉंग्रेस पार्टीचे नेतृत्व मोठ्या स्तरावर भ्रष्टाचारविरोधी भूमिका घेतात असे म्हणत त्यांना अमोल किर्तीकरांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत हे दिसत नाही का? असा प्रश्नही निरूपम यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना विचारला आहे.

शीर्ष नेतृत्वाकडून मी अपेक्षा करतो की, अशा उमेदवारांसंदर्भात ते भूमिका घेतीलच पण, ज्या पद्धतीने पक्षात निर्णय घेतले जात आहेत ते बघता पक्षश्रेष्ठींना प्रस्थापित नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची कोणती चिंता राहिलेली नसल्याचे माझं मत आहे. सांगलीचा उमेदवार ज्याप्रकारे उद्धव ठाकरेंनी जाहीर केलाय, ते बघता त्यांना कॉंग्रेसची पर्वा नाही हे स्पष्ट होत असून, कॉंग्रेसच्या वोटबॅंकेत आपली जागा बनवावी, हा शिवसेने ठाकरे गटाचा छुपा अजेंडा असू शकतो याबाबत कॉंग्रेसने भूमिका घेतली पाहिजे असे ते म्हणाले.

छगन भुजबळांना थेट दिल्लीतून निरोप, नाशिक लोकसभेची तयारी सुरू करण्याचे दिले आदेश

शिंदेंच्या सेनेत गेल्यास मिळणार तिकीट?

ज्या पद्धतीने निरूपम यांनी त्यांची भूमिका पत्रकार परिषद घेत मांडली आहे. ते बघता निरूपम यांची त्यांच्या पक्षात कोंडी होत असल्याची आणि वरिष्ठ नेते त्यावर कोणतीही ठोस भूमिका घेत नसल्याने नाराज असल्याचे निरूपम यांच्या विधानांवरून स्पष्ट दिसून येत होते. निरूपम यांनी आठवडाभरात नवी घोषणा ऐकायला मिळेल असे सूचक विधान केल्याने ते आता भाजपमध्ये जातात की शिंदेंचं धनुष्य हाती घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. जर निरूपम यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यास त्यांना खासदार गजानन कीर्तीकर यांच्या जागी उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून तिकीट मिळण्याची शक्यता आहे. गतवेळी याच मतदारसंघात कीर्तीकर यांनी निरुपम यांचा 2 लाख 60 हजार मतांनी पराभव केला होता.

संजय निरुपम हे देखील यंदा उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते. मात्र हा मतदारसंघ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वाट्याला गेल्याने त्यांनीही शिवसेना प्रवेशाचे मार्ग अवलंबल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी या जागेवरुन शिवसेनेकडून अभिनेता गोविंदाच्या नावाचीही चर्चा होती. परंतू, शिंदे यांनी निरुपम यांच्याच नावाला पसंती दिली आहे. त्यामुळे गोविंदा यांचे नाव आता मागे पडले आहे.

follow us

वेब स्टोरीज