Download App

धैर्यशील मानेंचं टेन्शन वाढलं! आमदार प्रकाश आवाडे लोकसभेच्या रिंगणात

  • Written By: Last Updated:

Prakash Awade will contest election from Hatkanangale : हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून (Hatkanangle Lok Sabha Constituency) निवडणूक लढवणार असल्याची घोषणा अपक्ष आमदार प्रकाश आवाडे (Prakash Awade) यांनी केली. आज पत्रकार परिषदेत घेत त्यांनी ही घोषणा केली. आमदार आवाडेंनी हातकणंगलेतून लढणार असल्याची घोषणा केल्यानं महायुतीचे उमेदवार धैर्यशील मानेंना (Dhairyashil Mane) मोठा धक्का बसला आहे. आवाडे लोकसभेच्या रिंगणात उतरल्यानं या मतदारसंघात पचरंगी लढत होणार आहे.

..तर आम्हीही बारामतीत मदत करणार नाही; भाजप नेत्यांचा अजितदादांना रोखठोक इशारा 

नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आपण ही निवडणूक लढवत असल्याची घोषणा आवाडे यांनी केली. जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक आणि आमदार विनय कोरे आणि शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावरकर हे आवाडे यांच्यासोबत असल्याचा दावा त्यांनी केला.

Photos: झरीन खानने कुटुंबासोबत साजरी केली ईद, आई आणि बहिणीचे फोटो केले शेअर, मात्र चाहते… 

ते म्हणाले, मी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देणार आहे. या मतदारसंघात मी परिचित आहे. माझं काम संपूर्ण राज्यात माहिती आहे. कामासाठी माझ्या इचलकरंजीमधील एकही माणूस बाहेर जात नाही. हेच परिवर्तन संपूर्ण लोकसभा मतदारसंघात करणार आहे. एकदाच निवडणूक लढवणार आणि जिंकणारसुध्दा, अशा आवाडे यांनी विश्वास व्यक्त केला.

मतदारांनी संधी दिली तर खासदार कसा असतो? खासदार काय काम करू शकतो हे दाखवून देतो. मी कोणतीही बंडखोरी केली नाही किंवा मला कुणी उभे राहा, याबद्दल सांगिलते नाही. इथं जातीचं कार्ड चालणार नाही. कोण विकास करतो, हे कार्ड चालणार, अशा शब्दात त्यांनी विरोधकांना सुनावलं.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार धैर्यशील माने यांना महायुतीने उमेदवारी जाहीर केली असली तरी सध्या भाजपसोबत असलेल्या नेत्यांची भूमिकेबाबत शंकाच आहे. या पार्श्वभूमीवर ‘जनसुराज्य’चे आमदार डॉ. विनय कोरे, इचलकरंजीचे आमदार प्रकाश आवाडे आणि शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची बंद दाराआड दोन तास चर्चा झाल्याचे वृत्त आहे. त्यानंतर आवाडे यांनी आपण लोकसभा निवडणूक लढणार असल्याची घोषणा केली.

हातकणंगलेतून कोण रिंगणात?
हातकणंगलेतून महायुतीच्या वतीने धैर्यशील माने लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत. तर, स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे राजू शेट्टी यांनीही प्रचाराला सुरुवात केली आहे. दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने माजी आमदार सत्यजित पाटील यांना उमेदवारी दिली आहे. तर वंचित बहुजन आघाडीकडून डी.सी. पाटील हेही मैदानात आहेत. ही चौरंगी लढत लोकसभा मतदारसंघात चर्चेत असताना आज आवाडे यांच्या माध्यमातून आणखी एक तगडा उमेदवार लोकसभेच्या मैदानात उतरला, त्यामुळं पचरंगी लढत होणार आहे.

 

follow us