Download App

निवडणूक जाहिरातीसाठी पैसे खर्च करण्यात भाजप नंबर वन! तीन महिन्यात 38.7 कोटी खर्च

  • Written By: Last Updated:

Lok Sabha elections Election Advertisement : सध्या देशात लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha elections) रणधुमाळी सुरू आहे. सर्वच राजकीय पक्षांनी आणि उमेदवारांनी आता प्रचाराला सुरुवात केली आहे.  प्रचारसाठी राजकीय (Election Advertisement) पक्षांकडून जाहिराती केल्या जात आहेत. देशातील राजकीय पक्षांनी आतापर्यंत जाहिरातींवर करोडो रुपये खर्च केले आहेत. चारसौ पार चा नारा देणाऱ्या भाजपने (BJP) गेल्या 100 दिवसांत अधिकृतपणे ऑनलाइन जाहिरातींवर 38.7 कोटी रुपये खर्च केले आहेत.

‘शाहु महाराजांवर गाढवांनी बोलू नये’; आंबेडकरांनी ठाकरे, पवारांनाही सोडलं नाही… 

सध्या विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म राजकीय जाहिरातींचा पूर आला आहे.  या जाहिराती मोफत प्रकाशित केल्या जात नाहीत. त्यासाठी संबंधित राजकीय पक्षांना पैसे द्यावे लागतात.

भाजपने गेल्या 100 दिवसांत अधिकृतपणे ऑनलाइन जाहिरातींवर 38.7 कोटी रुपये खर्च केले आहेत. त्यात केंद्र सरकारच्या संचार विभागाच्या 32.3 कोटी जाहिरातींच्या खर्चाची भर घातली तर या कालावधीतील एकूण राजकीय जाहिरातींवरचा खर्च 114 कोटी रुपये आहे. त्यात भाजपचा वाटा 70 कोटी रुपये आहे. त्या तुलनेत प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसने केवळ 7 कोटी रुपये खर्च केले आहेत.

अल्लू अर्जुन जोरदार! ओटीटी प्लॅटफॉर्मने तब्बल इतक्या कोटींना विकत घेतले ‘पुष्पा 2’चे हक्क 

गुगलवर नोंदवलेल्या आकडेवारीनुसार, भाजपने 1 जानेवारी ते 9 एप्रिल  2024 पर्यंत जाहिरातींवर 38.7 कोटी रुपये खर्च केले आहेत, तर फेसबुक आणि इन्स्टाग्राम या ॲपची कंपनी असलेल्या मेटावर  भाजपचा अधिकृत खर्च 6 कोटी 77 लाख रुपये आहे.

केंद्रीय संचार विभागाच्या  (पूर्वीच्या डीएव्हीपी) मार्फत ‘मोदी सरकार की गॅरंटी’ या जाहिरात मोहिमेवर 32.3 कोटी रुपये खर्च करण्यात आले.

विशेष म्हणजे 2019 मध्ये 1 जानेवारी ते 31 मे या कालावधीत भाजपने 1.52 कोटी रुपये खर्च केले होते. त्या तुलनेत यंदा पक्षाचा खर्च आधीच तिपटीने वाढला असून तो आणखी वाढणार आहे.

100 दिवसांत  जाहिरातींवर 114 कोटींची उधळपट्टी

गुगलवर नोंदणीकृत राजकीय जाहिराती पाहिल्या तर गेल्या 100 दिवसांत राजकीय जाहिरातींवर 114 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. यामध्ये भाजप सर्वाधिक खर्च करते आणि त्याखालोखाल केंद्र सरकारच्या संचार विभागाचा नंबर आहे.  त्यानंतर ‘पॉप्युलस एम्पॉवर नेटवर्क प्रा. लि. या संस्थेने प्रामुख्याने DMK संबंधित जाहिरातींवर खर्च केला आहे आणि चौथ्या क्रमांकावर इंडियन पीएसी कन्सल्टिंग प्रायव्हेट लिमिटेड आहे,  जी तृणमूल काँग्रेससाठी जाहिरात करते.

कॉंग्रेसने मार्चपर्यंत ऑनलाइन जाहिरातींवर जेमतेम 50 लाख रुपये खर्च केले.  काँग्रेसने एप्रिलच्या आठ दिवसांत ऑनलाइन प्रचारावर 6.24 कोटी रुपये खर्च केले आहेत.

 

follow us