Download App

माझ्यावर टीका करणारे पाच वर्ष फक्त शुटींगमध्येच व्यस्त…; आढळरावांची अमोल कोल्हेंवर टीका

पाच वर्षात कोल्हे मतदारसंघातल्या कोणत्या गावात गेले नाहीत. कोणता निधी दिला नाही. त्यांचा खासदारकीचा 80 टक्के निधी परत गेला. - अमोल कोल्हे

Adharao Patil on amol Kolhe : शिरूर लोकसभेचे महायुचीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adharao Patil) यांच्या प्रचारार्थ आज देवेंद्र फडणवीसांची शिरुरमध्ये सभा झाली. या सभेत बोलतांना आढळराव पाटलांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. राहुल गांधींच्या नावाचा शेंबडं पोरगंही पंतप्रधान म्हणून विचार करत नाही, अशा शब्दात त्यांनी राहुल गांधींव (Rahul Gandhi) टीकास्त्र डागलं. तर आज जे माझ्यावर टीका करणारे पाच वर्ष फक्त शुटींगमध्येच व्यस्त होते,असा हल्लाबोल अमोल कोल्हेंवर केला.

माझ्यावर टीका करणारे पाच वर्ष फक्त शुटींगमध्येच व्यस्त…; आढळरावांची अमोल कोल्हेंवर टीका 

राहुल गांधींना शेंबडं पोरगंही… 

या सभेला संबोधित करतांना आढळराव पाटील म्हणाले, ही निवडणूक देश कुणाच्या हातात द्यायचा? हे ठरवणारी आहे. आपल्यापुढं दोन पर्याय आहेत, एकीकडे, ज्यांनी जगाला भारताची ओळख प्रगत राष्ट्र अशी करून दिली, ते पंतप्रधान नरेद्र मोदी आहेत. तर दुसरीकडे राहुल गांधी. राहुल गांधींच्या नावाचा शेंबडं पोरगंही पंतप्रधान म्हणून विचार करत नाही, अशी टीका त्यांनी केली.

पराभव दिसत कोल्हेंची माझ्यावर टीका…
मी आज फक्त विकासकामासाठी निवडणुकीत उभा आहे. समोरच्या उमेदवाराला काहीही टीका करू द्या. पंधरा वर्षांच्या खासदारकीच्या काळात आढळरावांनी संरक्षणाचे प्रश्न अधिक विचारले अन् स्वत:च्या कंपनीचे हित साधले असा आरोप माझ्यावर केला जातो. पण, मी विचारलेल्या प्रश्नांचा आणि माझ्या व्यवसायाचा जराही संबंध नाही, मुद्दे नसल्यानं आणि पराभव दिसत असल्यानं कोल्हे माझ्यावर टीका करतात, असं आढळराव म्हणाले.

Poonch IAF Convoy Attack : बदला घेणारचं! संशयित दहशतवाद्यांचे रेखाचित्र जारी 

पाच वर्षापासून मी मतदारसंघात काम करतोय. मी अनेक गोरगरिबांचे संसार उभे केले.
कोरोना काळात मी माझं शिरूर तालुक्यात जिथं जिथं गरज असेल, तिथं औषधं पुरवत होतो. मात्र, आज जे माझ्यावर टीका करतात, ते पाच वर्ष मुंबईत शुटींगमध्ये व्यस्त होते. कोल्हेंनी विकासाच्या वल्गना करू नये. पाच वर्षात कोल्हे मतदारसंघातल्या कोणत्या गावात गेले नाहीत. कोणता निधी दिला नाही. त्यांचा खासदारकीचा 80 टक्के निधी परत गेला, असा हा निष्क्रीय खासदार आहे, अशी टीका आढळरावांनी केली. यांच्या काळात विकासाचा आराखडा फक्त कागदावरच राहिला, असंही ते म्हणाले.

मला राजकारणात करियर करायचं म्हणून मी राजकारणात नाही. तुम्ही विश्वास दाखवल्यानं मी पंधरा वर्ष खासदार राहिलो होतो. आता तुम्हाला वाऱ्यावर सोडायचं नसल्यानं मी लढतोय, तुमच्यासाठी लढणार, असं आढळराव म्हणाले.

आढळराव म्हणाले, पाचशे वर्ष राम मंदिराची उभारणी झाली नाही. मात्र, नरेंद्र मोदींना सत्तेत आल्यानंतर राम मंदिर भूमिचा वाद सोडवला आणि राम मंदिराची उभारणी केली. कलम 370 हटवलं. मोदींना विकासालाचा चालना दिली. आमच्या साहेबांनी 70 हजार कोटींची शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली असं विरोधक सांगत असतात. केली असेल शेतकऱ्यांना मदत. पण, मोदींनी दरवर्षी 12 कोटी शेतकऱ्यांनी पीएस किसान योजनाच्या माध्यमातून 72 हजार कोटी रुपये दिले. पाच वर्षात 3 लाख 60 हजार कोटी रुपयांची शेतकऱ्यांना मदत केल्याचं आढळराव म्हणाले.

 

follow us