BJP Cut Ticket Brijbhushan singh : महिला कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचे गंभीर आरोप केलेले भाजपचे विद्यमान खासदार ब्रृजभूषण सिंह (Brijbhushan Singh) यांचा पत्ता कट करत भाजपने त्याचे पुत्र करण शरण सिंह यांना उमेदवारी दिली. भाजपने (BJP) उत्तर प्रदेशमधील उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यात कैसरगंज लोकसभा मतदारसंघातून ब्रृजभूषण सिंह यांना डावलण्यात आलं.
…त्यानंतर फडणवीसांना नमस्कार घालायलाही माणूस राहणार नाही; धंगेकरांचा घणाघात
भाजपा की केंद्रीय चुनाव समिति ने आगामी लोकसभा चुनाव 2024 हेतु अपनी 17वीं सूची में निम्नलिखित दो नामों पर अपनी स्वीकृति प्रदान की है। pic.twitter.com/BzbzxikzVM
— BJP (@BJP4India) May 2, 2024
भाजपने आज उत्तर प्रदेशमधील 2 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. त्यामध्ये रायबरेली मतदारसंघातून दिनेश प्रताप सिंह यांना संधी देण्यात आली आहे. तर, कैसरगंज मतदारसंघातून करण भूषण सिंह यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यमान खासदार ब्रजभूषण शरण सिंह यांचा पत्ता कापण्यात आला. मात्र, भाजपने त्यांच्या घरात उमेदवारी देत एकप्रकारे त्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न केल्यचां दिसून येत आहे.
‘नाच गं घुमा’ चित्रपटाला मिळणाऱ्या भरघोस प्रतिसादाबद्दल स्वप्नीलने मानले प्रेक्षकांचे आभार; म्हणाला…
करण भूषण सिंह हे शुक्रवारी सकाळी ११ वाजता उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
कैसरगंज लोकसभा मतदारसंघावर ब्रृजभूषण सिंह यांची मजबूत पकड आहे. स्वत: ब्रृजभूषण सिंह यांनी लोकसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र गेल्या वर्षी ब्रृजभूषण सिंग वादाच्या भोवऱ्यात सापडल्यानं त्यांच्या ऐवजी त्यांच्या घरातील सदस्याला भाजप उमेदवारी देईल, अशी शक्यता होती. या शक्यतेवर आज शिक्कामोर्तब झालं. दरम्यान, कैसरगंज जागेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ मे आहे. या जागेवर पाचव्या टप्प्यात मतदान होणार आहे.
ऑलिम्पिक विजेत्या कुस्तीपटूंनी अखिल भारतीय कुस्ती संघटनेचे तत्कालीन अध्यक्ष आणि खासदार ब्रृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात दिल्लीतील जंतरमंतर येथे निदर्शने केली. साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि इतर महिला कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचे गंभीर आरोप करत या आंदोलनाच्या माध्यमातून मोदी सरकारवरला चांगलंच धारेवर धरलं होतं. विशेष म्हणजे महिला कुस्तीपटूंनी आपली ऑलिम्पिक पदकेही नदीत विसर्जित करण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्थानिक ग्रामस्थ आणि वरिष्ठ नेत्यांच्या आग्रहानंतर त्यांनी पदक विसर्जित करण्याचा निर्णय बदलला. खासदार ब्रृजभूषण सिंह यांच्यामुळे भाजपवर नामुष्कीची वेळ आली होती. त्यामुळं भाजपने त्यांचा पत्ता कट केला आहे.