Download App

पुन्हा राजकीय भूकंप! धैर्यशील मोहिते आणि रामराजे निंबाळकर ‘तुतारी’ फुंकणार?

  • Written By: Last Updated:

Madha Loksabha : भाजप नेते धैर्यशील मोहिते पाटी (Dhairyashil Mohite) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचे ज्येष्ठ नेते रामराजे निंबाळकर (Ramraje Nimbalkar) हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. शरद पवार (Sharad Pawar) गटाकडून संजीवराजे निंबाळकर (Sanjivraje Nimbalkar) किंवा धैर्यशील मोहिते पाटील यांच्यापैकी एकाला उमेदवारी दिली जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.

SECR Recruitment : रेल्वेत विभागात बंपर भरती सुरू, 10 वी पास उमेदवारही करू शकतात अर्ज 

माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपचे नेते धैर्यशील मोहिते पाटील हे इच्छुक होते. त्यांनी आपली इच्छा जाहीरपणे व्यक्तही केली होती. मात्र, भाजपने खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. त्यामुळं त्यांच्या उमेदवारीला धैर्यशील मोहिते पाटील व रामराजे निंबाळकर यांनी विरोध केला. दोन्ही नेत्यांनी आपली भूमिका पक्षश्रेष्ठींसमोर मांडली होती. या दोन नेत्यांची मनधरणी करण्यासाठी भाजप आणि अजित पवार गटाकडूनही प्रयत्न सुरू होते. विशेष म्हणजे मंत्री गिरीश महाजन स्वत: अकलूजला जाऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र गिरीश महाजन यांच्यासमोरच मोहिते पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत शक्तीप्रदर्शन केलं होतं.

हर्षवर्धन पाटलांसह इंदापूर तालुक्याचे पालकत्व मी स्वीकारतो; देवेंद्र फडणवीसांचा थेट विधानसभेचा शब्द ? 

त्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील यांनी बुधवारी रात्री मुंबईत उशीरा शरद पवारांची भेट घेतली. या भेटीत धैर्यशील धैर्यशील यांच्या शरद पवार गटातील प्रवेशाबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे

महाविकास आघाडीत माढ्याची जागा शरद पवार गटाच्या वाट्याला आली आहे. माढा लोकसभा मतदारसंघातून शरद पवार गटाने अद्याप उमेदवार जाहीर केला नाही. भाजपने निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर मोहिते-पाटील कुटुंबीयांनी तीव्र नाराजी व्यक्त ही नाराजी हेरून शरद पवार गटाच्या वतीने अमोल कोल्हे यांनी अकलूज येथे जाऊन विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यासह रणजितसिंह मोहिते-पाटील, धैर्यशील मोहिते-पाटील यांची भेट घेतली होती. या सर्व घडामोडी पाहता मोहिते-पाटील आणि रामराजे निंबाळणकर हे शरद पवार प्रवेश करतील अशी चर्चा आहे.

 

 

 

follow us

वेब स्टोरीज