मंत्री जयकुमार गोरेंची बदनामी प्रकरण; रामराजे निंबाळकरांच्या दारात पोलिस…

Mla Ramraje Nimbalkar : ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांची बदनामी आणि खंडणी प्रकरणी वडूस पोलिसांचा तपास सुरु आहे. या तपासासाठी पोलिसांनी एकूण 11 जणांना समन्स पाठवले होते. यामध्ये विधान परिषदेचे आमदार रामराजे निंबाळकर (Mla Ramraje Nimbalkar) यांचाही समावेश होता. रामराजे निंबाळकर पोलिस चौकशीला हजर न झाल्याने आज वडूस पोलिस थेट रामराजे निंबाळकरांच्या दारातच दाखल झाले आहेत. या प्रकरणात रामराजेंचा हात आहे की नाही? याची चाचपणी पोलिस करणार असल्याची माहिती समोर येत आहे.
सरकारीबाबू, बिल्डर, राजकारणी यांनी पुण्यातील हजार कोटींची वनजमीन कशी हडपली ? संपूर्ण स्टोरी
काही दिवसांपूर्वीच मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेला 1 कोटी रुपयांची खंडणी घेताना पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. यावेळी महिलेसह एकूण तीन जणांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर रामराजे निंबाळकर आणि या महिलेची एक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतरच ही चौकशी होत असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे आता रामराजे निंबाळकर यांचा जयकुमार गोरेंची बदनामी आणि खंडणी प्रकरणात हात आहे की नाही? याचा उलगडा पोलिसांकडून केला जात आहे.
पाकिस्तानी अण्वस्त्रांबाबत राजनाथ सिंहांचं मोठं विधान; पाकिस्तानची झोप उडणार
मंत्री जयकुमार गोरे संदर्भातील खंडणी आणि बदनामी प्रकरणात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते सहभागी असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. त्यापैकी माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख आणि विधानसभा निवडणुकीतील शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे पराभूत उमेदवार प्रभाकर घार्गे यांना चौकशीसाठी शुक्रवारी (२ मे) वडूज पोलीस ठाण्यात हजर राहण्याची नोटीस वडूज पोलिसांनी बजावली होती. मात्र, देशमुख आणि घार्गे हे पोलीस ठाण्यात हजर राहिलेले नाहीत.
सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंद असलेला १ कोटीच्या खंडणीचा गुन्हा वडूज पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. या गुन्ह्यात एका महिलेसह युट्यूट चॅनेलचे पत्रकार तुषार खरात यांना अटक करण्यात आली होती. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. याच गुन्ह्याच्या अनुषंगाने आता आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांना शनिवारी (३ मे) हजर राहण्यास नोटीसीद्वारे कळवण्यात आलं.