Download App

Video : मविआ राज्यात 48 पैकी 46 जागा जिंकण्याची हवा; खरगेंनी मुंबईत येऊन दावा ठोकला

मोदींच्या काळात बेरोजगारी आणि महागाई वाढल्याचा आरोपही खरगेंनी केला.

  • Written By: Last Updated:

मुंबई : राज्यात ज्या पद्धतीचे वातावरण आहे ते बघता 48 पैकी 46 जागा महाविकास आघाडी जिंकेल असा दावा काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge ) यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे महायुतीचं 45 प्लसचं गणित बिघडणार क? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. राज्यात 48 पैकी 46 जागा आम्ही जिंकू अशी हवा सध्या महाविकास आघाडीचंही खरगे म्हणाले. (MVA Will Will 46 Seats In Maharashtra Says Mallikarjun Kharge In Mumbai)

Sanjay Raut: शिवसेना नेते संजय राऊतांवर नगरमध्ये गुन्हा दाखल, मोदींबाबतचं ‘ते’ वक्तव्य भोवलं

मोदींवर जोरदार निशाणा

पत्रकार परिषदेत बोलताना खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला. विरोधकांना देशद्रोही ठरवत स्वतः देशप्रेमी असल्याचे ढोंग मोदी करत असल्याचेही खरगे म्हणाले. मोदींनी गेल्या 10 वर्षात दिलेलं कोणतेही आश्वासन पूर्ण केलेले नसल्याचेही ते म्हणाले. मोदींच्या काळात बेरोजगारी आणि महागाई वाढल्याचा आरोपही खरगेंनी केला.

विश्वासघाताचं राजकारण सुरू आहे

महाराष्ट्रातही महाविकास आघाडी मजबूत असून, चार टप्प्यातील वातावरण आणि मतदानाचा टक्का बघता राज्यात 48 पैकी 46 जागा मविआ जिंकेल अशी हवा आहे. महाराष्ट्रात बेकायदा पद्धतीने महायुतीचे सरकार बनवण्यात आले. या असंवैधानिक सरकारला पंतप्रधान पाठिंबा देतात असाही हल्लाबोल खरगेंनी केला. 53 वर्षांच्या माझ्या राजकारणात हे असा कधी पाहिलं नाही. विश्वासघाताचा राजकारण सुरु आहे. धमकी देत राजकारणात पक्षांची तोडफोड केली जात आहे. निवडणूक आयोग, न्यायालय निर्णय जरी देत असले, तरी मोदींच्या इशाऱ्यावर यंत्रणा चालत आहेत. लोक नाराज आहेत.

“आधी संघाची गरज पडायची, आता भाजप सक्षम, स्वतःच पक्ष चालवतो”; नड्डांचं मोठं विधान

मोदींमुळे मुंबईकडे दुर्लक्ष  

मुंबईमध्ये मागील दोन वर्षांपासून महानगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या नाहीत. अनेक राज्यांमध्ये मोडतोड करुन सत्ता मिळवण्यात भाजपला यश मिळत आहे. परंतु या लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला मोठं यश मिळणार आहे. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. याठिकाणी आरबीआयचे कार्यालय आहे. परंतु, जेव्हापासून मोदी सत्तेत आले आहेत तेव्हापासून या शहराकडे दुर्लक्ष केले जात असून, शहराला खाली खेचण्याचे काम होत आहे.

follow us