Download App

महाराष्ट्राच्या पहिल्याच सभेत राहुल गांधींचा घणाघात! कर्जमाफी, अग्निवीर योजना बंद करण्याचं दिलं आश्वासन

  • Written By: Last Updated:

Rahul Gandhi sakoli sabha : पहिल्या टप्यातातील पाच मतदारसंघाच्या मतदानासाठी आता अवघे पाच दिवस उरले आहेत. या पार्श्वभूमीवर आज भंडारा-गोंदिया लोकसभेचे (Bhandara-Gondia Lok Sabha) महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत पडोळे (Prashant Padole) यांच्या प्रचारार्थ राहुल गांधींनी (Rahul Gandhi) सभा घेतली. यावेळी त्यांनी अग्नीवीर योजना (Agniveer Yojana) बंद करू, शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू, अशी आश्वासने दिली.

Play School Fees: प्ले स्कूलची फी चक्क सव्वा चार लाख रुपये, पोस्ट व्हायरल; सीए म्हणतो,माझ्या संपूर्ण शिक्षणापेक्षा…

जनतेचं कर्ज माफ करू…
राहुल गांधी म्हणाले की, गेल्या 10 वर्षांत मोदींनी उद्योगपतींसाठी सरकार चालवले, हे मोदींचे सरकार नसून अदानींचे सरकार आहे. आम्ही अदानींचे सरकार चालवणार नाही, तर शेतकरी, गरीब आणि बेरोजगारांचे सरकार चालवणार आहोत. ते पुढे म्हणाले की आम्ही खोटं बोलत नाहीत. या सरकारने उद्योगपतींचे कर्ज माफ केलं. मग देशातील गरीब आणि गरजू लोकांची कर्ज का माफ होत नाहीत, आमचं सरकार आल्यावर देशातील जनतेची कर्ज माफ केली जातील, अशी घोषणा राहुल गांधींनी केली.

पेपरफुटीवर कडक कायदा केला जाईल

पेपरफुटीवर कडक शासन तयार केले जाईल. कोणतीही खाजगी कंपनी विद्यार्थ्यांची परीक्षा घेणार नाही. सरकारी नोकऱ्या सरकारी अधिकाऱ्यांमार्फतच घेतल्या जातील, असेही राहुल गांधींनी स्पष्ट केले.

प्रत्येक महिलेला वर्षाला 1 लाख रुपये देणार.
ते म्हणाले, आमचे सरकार आल्यावर आम्ही जातनिहाय जनगणना करू, असे राहुल गांधी म्हणाले. प्रत्येक घरातून एक महिला निवडून तिच्या खात्यात एक लाख रुपये जमा करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला खात्यात साडे आठ हजार म्हणजेच वर्षाला 1 लाख रुपये दिले जातील, असंही आश्वासन त्यांनी दिलं.

10 वर्षात मोदींनी फक्त उद्योगपतींसाठी सरकार चालवलं; राहुल गांधींचा मोदींवर घणाघात 

आमचं सरकार आल्यावर पहिल्यांदा अग्निवीर योजना बंद करू. ही योजना मोदींच्या कार्यालयात तयार करून लष्करावर लादला गेली. या योजनते शहीद जवानांना पेन्शन नाही. त्यामुळे आमचे सरकार आल्यावर ही योजना बंद केली जाईल, आणि शहीदांना पेन्शन देऊ, असे राहुल गांधी म्हणाले.

राहुल गांधींची मोदींवर टीका
यावेळी बोलतांना राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला. आपल्याकडे हरितक्रांती झाली, दुग्धक्रांती झाली, बँकांचे राष्ट्रीयीकरण झाले, पण मोदी 24 तास धर्मावर बोलतात, समुद्राखाली आर्मा लावून पूजा करतात, अशी टीका त्यांनी केलाी.

ते म्हणाले, आदिवासी असल्याने देशाच्या राष्ट्रपतींना राम मंदिराच्या उद्घाटन समारंभाला जाऊ दिलं नाही. अदानी, अंबानी तिथं होते. मात्र तिथं एकही मागासवर्गीय नसल्याचा आरोपही त्यांनी केला. पंतप्रधान मोदींनी देशाची खिल्ली उडवली असल्याची टीका राहुल यांनी केली. कोरोनामध्ये हजारो लोक मरत असताना लोकांना टाळ्या वाजवायला सांगण्यात आल्याची टीका त्यांनी केली.

follow us