Download App

फडणवीससाहेब, फुंकर मारून यांचा वाडा उद्धवस्त करा; सदाभाऊ खोतांचा मोहिते पाटलांवर निशाणा

Sadabhau Khot यांनी देखील माढ्याच्या सभेत भाषण केलं. त्यावेळी त्यांनी धैर्यशील मोहिते पाटलांवर जोरदार निशाणा साधला.

Sadabhau Khot Criticize Dhairshil Mohite Patil : लोकसभा निवडणुकीची ( Lok Sabha Election ) रणधुमाळी सुरु असून पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Modi) आज महायुतीच्या उमेदवारांसाठी राज्यात प्रचारसभा घेत आहेत. आज मोदी यांची रणजितसिंह नाईक निंबाळकरांसाठी माढ्यामध्ये सभा झाली. या सभेत रतच्या सदाभाऊ खोत ( Sadabhau Khot ) यांनी देखील भाषण केलं. त्यावेळी त्यांनी फडणवीससाहेब, फुंकर मारून यांचा वाडा उद्धवस्त करा. असं म्हणत धैर्यशील मोहिते पाटलांवर जोरदार निशाणा साधला.

‘उज्ज्वल निकम यांना… जेलमध्ये पाठवायला हवं’; मराठमोळ्या अभिनेत्याची ‘ती’ पोस्ट चर्चेत

खोत म्हणाले की, माढा मतदारसंघातील लढा घराणेशाहीच्या विरोधातील आहे. गेली 60 वर्ष यांच्या घरात सत्ता आहे. साखर कारखाने, दुध संघ, कारखान्याचे चेअरमन, नगराध्यक्ष, जिल्हा परिषद अध्यक्ष, बॅंक डायरेक्टर सर्व काही यांचं आहे. या भागात आमच्याशिवाय कोणी राजकारणात येऊच शकत नाही. असं लायसन्स त्यांनी आणलंय पण या निवडणुकीत हे लायसन्स रद्द करत आपल्याला त्यांचा वाडा उद्धवस्त करायचा आहे. असं म्हणत सदाभाऊ खोत यांनी मोहिते पाटलांवर निशाणा साधला.

राजकीय पक्षांचे दावे फोल; पहिल्या दोन टप्प्यांत फक्त 235 महिलांनाच मिळालं तिकीट

तसेच ते पुढे म्हणाले की, भाजपने त्यांना न्याय दिला तरी त्यांचं समाधान नाही. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सांगेन की, एक विनंती करेन की, तुम्ही फुंकर मारा निश्चित या प्रस्थापितांचा वाडा उद्धवस्त होईल. तसेच या इंडिया आघाडीच्या उमेदवारांकडून लग्नाच्या अक्षदा वाटल्या जात आहेत. मात्र त्यांचा नवरदेवच निश्चित नाही. पंतप्रधान पदाचा उमेदवारचं निश्चित नाही. असंही खोत म्हणाले.

तर या सभेत मोदींनी खास शैलीत भाषण करत विजयासाठी विशेष डाव टाकला आहे. मोदींच्या या खेळीने मविआचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटलांच्या विजयाची धाकधूक वाढली आहे. माळशिरसमधील सभेसाठी मोदींनी धनगरसमाजाच पेहराव करून उपस्थिती दर्शवली. मोदींनी त्यांच्या भाषणाची सुरूवात शिवाजी महाराजांच्या जयघोषाने आणि मराठीतून भाषणाने केली. मोदींनी यावेळी येळकोट येळकोट आणि बाळूमामांच्या नावाचा जयघोष केला. मोदींच्या या खास जयघोषाने मोदींनी धनगर समाजाच्या काळजात हात घातल वोटबँक फिक्स केली आहे.

follow us