Download App

देशाला परिवर्तनं हवंय! मोदींची शक्ती कमी करणं देशाची गरज…; पवारांचे टीकास्त्र

  • Written By: Last Updated:

Sharad Pawar On PM Modi : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha elections) अनुषंगाने आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. भाजपने चारशे पारचा नारा दिल्यानं विरोधकांकडून मोदींवर सातत्याने टीका केली जाते. भाजपला संविधान बदलायचं असल्यानं त्यांनी चारशे पारचा नारा दिल्याची टीका विरोधक करत आहेत. दरम्यान, आता राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी (Sharad Pawar) मोदींवर (PM Narendra Modi) जोरदार टीका केली. मोदींची शक्ती कमी करणं ही देशाची गरज आहे, असं पवार म्हणाले.

भाईजानच्या घरावरील गोळीबारानंतर शिवची प्रतिक्रिया; म्हणाला, ‘ऊपर वाले की और हमारी दुआ..’ 

महायुतीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शरद पवार आज साताऱ्यात आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना पवार म्हणाले की, सोलापूरमध्ये यशवंतराव चव्हाण, यशवंतराव मोहिते अशी कर्तृत्ववान माणसं होऊन गेली. त्यांच्या विचारांचा प्रभाव आजही सातारच्या लोकांवर आहे. त्यामुळेच आज पुरोगामी विचारांच्या माणसाच्या उमदेवारी अर्ज दाखल करण्यासाठी साताऱ्यातून उत्तम प्रतिसाद मिळालं. हजारोंच्या संख्येने लोक आले होते. याचाच अर्थ असाय की, देशाला परिवर्तन हवंय, असं पवार म्हणाले. सातारच्या लोकांनी दिलेल्या प्रतिसादामुळं आत्मविश्वास वाढल्याचंही पवार म्हणाले.

शेअर बाजारात ‘आपटीबार’; गुंतवणूकदारांना धक्का, इराण-इस्रायल तणावाचा दिसला मोठा इफेक्ट! 

शिंदेंच विजयी होणार
ते म्हणाले, साताऱ्याने नेहमीच पुरोगामी विचारांना महत्व दिलं. साताऱ्यातून शशिकांत शिंदेचं विजयी होणार. गेल्या निवडणुकीत तुम्ही पाहिलंय साताऱ्याच्या जनतेने काय कौल दिला आणि कुणाला कौल दिला? आता तर अनेक पक्षांचा पाठिंबा आहे. आज महाविकास आघाडीत अनेक लहान पक्ष एकत्र आले. मोदींची एकएक जागा कमी केली पाहिजे, या विचारांनी सगळे एकत्र आलेत. मोदींची शक्ती कमी केली पाहिजे, ही देशाची गरज आहे, असं पवार म्हणाले.

शशिकांत शिंदे याचं नाणं खणखणीत
शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांनी शशिकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. नवी वासी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गाळे विक्री प्रकरणात ४ हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप शिंदेवर केला. याबाबत विचारले असता पवार म्हणाले की, मी शिंदेंना याबाबत पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करावी, असं सांगितलं. ते उद्याच पत्रकार परिषद घेणार आहेत आणि आपली बाजू मांडतील. निवडणुकीच्या तोंडावर असे आरोप होत असतात. पण, शशिकांत शिंदे याचं नाणं खणखणीत आहेत.

दरम्यान, साताऱ्यातील रॅलीत शरद पवार यांच्यासह जयंत पाटील, श्रीनिवास पाटील यांनीही सहभाग घेतल्याचे दिसून आले.

follow us