Download App

कोट्यावधींचे दागिने, एफडी, शेअर्सच्या धनी असलेल्या सुप्रिया सुळेंची संपत्ती तरी किती?

  • Written By: Last Updated:
Image Credit: Letsupp

Supriya Sule Net Worth: बारामती लोकसभा (Baramati Lok Sabha) मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) उमेदवार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करतांना त्यांनी प्रतिज्ञापत्रही दाखल केले आहे. सुप्रिया सुळे यांच्याकडे कोट्यवधींची संपत्ती असल्याची माहिती यातून समोर आली. याशिवाय त्यांच्यावर तब्बर ५५ लाख रुपयांचं कर्ज आहे.

Lok Sabha Election : शिर्डीत तिरंगी लढत, उत्कर्षा रुपवते यांना वंचितकडून उमेदवारी 

त्यांच्याकडे एकूण स्थूल मालमत्ता 38 कोटींची आहे. तर त्यांचे सदानंद सुळेंची संपत्ती एक अब्ज 14 कोटी इतकी आहे.

त्यांनी प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार, सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार आणि त्यांचा मुलगा पार्थ पवार यांच्याकडून 55 लाख रुपयांचे कर्ज घेतले आहे. सुळे यांनी पार्थ पवार यांच्याकडून 22 लाख आणि सुनेत्रा पवार यांच्याकडून 35 लाखांचे कर्ज घेतले आहे. याशिवाय सुप्रिया सुळे यांच्याकडे 142 कोटींची संपत्ती असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे सुप्रिया सुळे यांना यावर्षी शेतीतून शून्य उत्पन्न मिळाले आहे. त्यांच्याकडे कोणतही वाहन नाही.

मोदी हे भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार…, भाजपने पवार कुटुंबात भांडणे लावली; पटोलेंची जहरी टीका 

सुळे कुटुंबाकडे किती मालमत्ता आहे?
2022-2023 मधील आयकर रिटर्नमध्ये दर्शविलेले एकूण उत्पन्न –
सुप्रिया सुळे- 1 कोटी 78 लाख 97 हजार 460 रुपये
सदानंद सुळे- 3 कोटी 90 लाख 02 हजार 220

रोख रक्कम
सुप्रिया सुळे- 42 हजार 500
सदानंद सुळे- 56 हजार 200

बँक खात्यातील ठेवी-
सुप्रिया सुळे- 11 कोटी 83 लाख 29 हजार 195
सदानंद सुळे- 2 कोटी 57 लाख 74 हजार 150 रु

शेअर्समध्ये गुंतवणूक –
सुप्रिया सुळे- 16 कोटी 44 लाख 24 हजार 140
सदानंद सुळे- 33 कोटी 57 लाख 58 हजार 962

राष्ट्रीय बचत योजना –
सुप्रिया सुळे- 7 लाख 13 हजार 500
सदानंद सुळे- 16 लाख 34 हजार 030

कर्ज म्हणून दिलेली रक्कम –
सुप्रिया सुळे- 3 कोटी 50 लाख 86 हजार 080
सदानंद सुळे- 60 कोटी 8 लाख 71 हजार 253

हिऱ्याच्या मौल्यवान वस्तू –
सोनं-
सुप्रिया सुळे – 1 कोटी 1 लाख 16 हजार 18 रुपयांचे सोने
सदानंद सुळे – 1 कोटी 13 लाख 81 हजार 855 रुपये किमतीचे सोने

चांदी –
सुप्रिया सुळेंकडे 4 लाख 53 हजार ४४६ रुपयांची चांदी आहे.
सदानंद सुळे- 17 लाख 62 हजार 72 रुपये किमतीची चांदी

हिऱ्यांच्या वस्तू –
सुप्रिया सुळे- 1 कोटी 56 लाख 06 हजार 321 रुपये
सदानंद सुळे- 1 कोटी 62 लाख 74 हजार 253 रुपये

एकूण स्थूल मूल्य –
सुप्रिया सुळे – 38 कोटी 6 लाख 48 हजार 431 रुपये
सदानंद सुळे- एक अब्ज 14 कोटी 63 लाख 80 हजार 575 रुपये

शेतजमिनीचे बाजार मूल्य
सुप्रिया सुळे- 9 कोटी 15 लाख 31 हजार 248 रुपये
सदानंद सुळे- 4 कोटी 66 लाख 26 हजार 094 रुपये

सुप्रिया सुळे यांचे कोणाचे किती देणे आहे –
पार्थ पवार – 20 लाख रु
सुनेत्रा पवार 35 लाख रु
———————–
जंगम मालमत्ता (एकूण मूल्य)
सुप्रिया सुळे – 38 कोटी 6 लाख 48 हजार 431 रुपये
सदानंद सुळे – 1 अब्ज 14 कोटी 63 लाख 80 हजार 575 रुपये

स्थावर मालमत्ता –
सुप्रिया सुळे- 9 कोटी 15 लाख 31 हजार 248 रुपये
सदानंद सुळे- 4 कोटी 66 लाख 26 हजार 94 रुपये

follow us

वेब स्टोरीज