Download App

… तर इंडिया आघाडीचे नेते मुस्लिमांसमोर मुजराही करतील, मोदींची जहरी टीका

PM Modi On India Aghadi : पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील प्रचारासाठी आज बिहारमध्ये होते. यावेळी

Image Credit: letsupp

PM Modi On India Aghadi : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील प्रचारासाठी आज बिहारमध्ये (Bihar) होते. यावेळी त्यांनी काराकाट आणि पाटलीपुत्रामध्ये जाहीर सभा घेत इंडिया आघडीच्या (India Aghadi) नेत्यांवर जहरी टीका केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, इंडिया आघाडीतील नेते मुस्लिमांची एकगठ्ठा मते मिळवण्यासाठी त्यांच्यासमोर मुजरा आणि गुलामगिरी करतील अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सभेत बोलताना केली.

या सभेत बोलताना मोदी म्हणाले, बिहार ही अशी भूमी आहे जिने सामाजिक न्यायाच्या लढ्याला नवी दिशा दिली आहे. या भूमीवरून मी आज जाहीर करतो की, एससी, एसटी आणि ओबीसींचे हक्क लुटण्याचे आणि ते मुस्लिमांना देण्याचे इंडिया आघाडी मनसुबे उधळून लावेन. इंडिया आघाडीचे नेते आपल्या व्होट बँकला खुश करण्यासाठी त्यांच्यासमोर मुजरा करू शकतात आणि गुलामगिरी देखील करू शकतात.

खरगे यांच्यावर पराभवाचे खापर फोडून परदेशात सुट्टीवर जाणार

तर काँग्रेस पक्षावर टीका करत मोदी म्हणाले, 4 जूनची संध्याकाळ होताच राजदचे लोक कॉग्रेस पक्षाचा पराभव झाला असं म्हणतील आणि काँग्रेसचे राजघराणे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खरगे यांच्यावर पराभवाचे खापर फोडून परदेशात सुट्टीवर जातील आणि बिचारे खरगेजी कार्यकर्त्यांचा रोष सहन करून थकतील असं मोदी म्हणाले.

तर राम मंदिर बांधले तर देशात अराजक माजेल, रक्ताच्या नद्या वाहतील असं काही लोक म्हणत होते मात्र आज मंदिरात भगवान राम उपस्थित आहे. कुठेही रक्ताच्या नद्या वाहत नाही. जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवले तर ते पाकिस्तानात जातील असे ते म्हणायचे. मात्र आम्ही कलम 370 हटवले आज जम्मू-काश्मीरमध्ये सर्वकाही व्यवस्थित होत आहे असं देखील मोदी म्हणाले.

मतदानात बंगाल पुन्हा आघाडीत! देशात सहाव्या टप्प्यात 5 वाजेपर्यंत 57.7 टक्के मतदान

follow us

वेब स्टोरीज