छ.संभाजीनगर : काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपनं धक्कातंत्राचा वापर करत मुख्यमंत्रीपदावर नव्या चेहऱ्यांना संधी दिली होती. त्यानंतर आता लोकसभेसाठीदेखील अनेक मतदासंघात भाजपनं चर्चेत नसलेल्या उमेदवारांना संधी दिली आहे. त्यानंतर आता भाजपच्या याच धक्कातंत्राची खेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) छ. संभाजीनगरच्या उमेदवारीसाठी खेळणार असल्याची चर्चा आहे. (Vinod Patil Might Contest From Eknath Shinde Led Shivsena For Chhatrapati Sambhajinagar loksabha )
बारामतीत भाऊ विरुद्ध बहीण? अजितदादाही भरणार अर्ज; ‘डमी’ उमेदवाराचं गणित काय?
काही जागांवर महायुतीत तिढा कायम
लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंर सर्वच पक्षांकडून ताकदवर उमेदवारांची घोषणा केली जात आहे. त्यात राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप या तीन पक्षांची महायुती आहे. या तिन्ही पक्षांकडून राज्यातील काही मतदारसंघात उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. तर, काही जागांबाबत अद्यापही तोडगा निघू शकलेला नाही. त्यातीलच एक जागा म्हणजे छ.संभाजीनगरची आहे.
Sangli Lok Sabha : …तर मी उमेदवारी मागे घेण्यास तयार; चंद्रहार पाटलांचे मोठे विधान
महायुतीत छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणुकीचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. याठिकाणी शिवसेनेकडून निवडणुकीसाठी उमेदवार उतरवला जाणार असल्याची चर्चा आहे. पण यावर महायुतीत अजूनपर्यंत शिक्कामोर्तब झालेले नाही. परंतु, भाजप आणि शिवसेनेकडून या ठिकाणी उमेदवारांची चाचपणी सुरू करण्यात आली आहे.
वाढदिवसाचे औचित्य पण, चर्चा उमेदवारी आणि चाचपणीची
एकीकडे भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष छ.संभाजीनगरमध्ये उमेदवार देण्यासाठी आग्रही असल्याची चर्चा असून, दोन्ही पक्षातील काही नेत्यांची नावे चर्चेत आहेत. यात महायुतीकडून भाजपचे केंद्रीय मंत्री भागवत कराड आणि शिवसेनेचे मंत्री संदीपान भुमरे यांची नावे चर्चेत असतानाच आता या स्पर्धेत एका नव्या चेहऱ्याची एन्ट्री झाली आहे. आपण वाढदिवस असल्याने शिंदेंचे आशीर्वाद घेण्यासाठी आल्याचे या इच्छूक उमेदवाराचे म्हणणे आहे. पण, वाढदिवसाचे औचित्य केवळ नावाला असून, शिंदे छ.संभाजीनगरच्या जागेसाठी भाजप सारखाच डाव खेळणार असल्याचे यामुळे बोलले जात आहे.
मिठाचा खडा पडलाच! महाविकास आघाडीत पहिली बंडखोरी, विशाल पाटलांनी भरला अपक्ष अर्ज
विनोद पाटलांनी भुमरे, कराडांचे टेन्शन वाढविले
छ.सभाजीनगरसाठी शिवसेनेकडून संदीपान भुमरे आणि भाजपच्या भागवत कराडांचे नाव चर्चेत आहे. पण, आता अचानाक मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते तसेच मराठा समन्वयक विनोद पाटील यांनी काल (दि.15) मुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट घेतल्याने भुमरे आणि कराड या दोघांचेही टेन्शन वाढले असून, आता या ठिकाणाहून नेमकी कुणाला संधी मिळते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
पाटील म्हणतात शिंदेंसोबत अपेक्षित चर्चा झाली
एकनाथ शिंदेंच्या भेटीबाबत बोलताना पाटील म्हणाले की, माझा वाढदिवस होता म्हणून वडिलधाऱ्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी मी शिंदेंची सदिच्छा भेट घेतली आहे. या भेटीवेळी आम्हा दोघांमध्ये अपेक्षित चर्चा झाल्याचे सांगत शिंदे मला उमेदवारी देतील, असा मला विश्वास असल्याचे पाटील म्हणाले. शिंदेंनी जिल्ह्याची परिस्थितीत, रचना तसेच समस्या समजून घेतल्या असून, माझ्या जमेच्या आणि कमकुवत बाजूही त्यांनी जाणून घेतल्या आहेत. मला उमेदवारी का द्यावी तसेच लोकांची मला मते देण्यामागची मानसिकता काय आहे हे दोन कळीचे मुद्दे चर्चेत विषय होते असेही विनोद पाटील यांनी स्पष्ट केले.
PM मोदींची सभा झाली… पण भाजप अन् मुनगंटीवारांना चंद्रपूर अजूनही सोपं नाही!
वंचित, ठाकरे अन् MIM चे उमेदवार मैदानात
छ.संभाजीनगरसाठी वंचित बहुजन आघाडी, एमआयएमकडून विद्यमान खासदार इम्तियाज जलील मविआकडून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे चंद्रकांत खैरे आदींची नावे घोषित करण्यात आली आहेत. याशिवाय माजी आमदार हर्षवर्धन जाधवही निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे आता महायुतीकडून छ.संभाजीनगरमधून नेकमी कुणाला संधी मिळणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.