Download App

पाचव्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात, राज्यात 13 जागांसाठी मतदान, ‘या’ दिग्गजांच भवितव्य पणाला

लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha elections) पाचव्या टप्प्यासाठी आज 6 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशातील 49 जागांवर मतदान होत आहे.

Lok Sabha elections : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha elections) पाचव्या टप्प्यासाठी आज 6 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशातील 49 जागांवर मतदान होत आहे. या टप्प्यात राज्यातील एकूण 13 लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. मुंबईतील (Mumbai) सहा मतदारसंघाशिवाय, नाशिक, दिंडोरी, ठाणे, कल्याण, पालघर, भिवंडी आणि धुळे या सहा लोकसभा मतदारसंघात (Maharashtra Lok Sabha Election) मतदान होत आहे. सकाळी सात वाजत मतदान सुरू झालं.

Horoscope Today : मोठी कामं करण्याची उत्तम संधी, पाहा कर्क राशीसाठी कसा आहे, आजचा दिवस 

आज राज्यातील 13 जागांव्यतिरिक्त उत्तर प्रदेशातील 14, पश्चिम बंगालमधील 7, बिहारमधील 5, झारखंडमधील 3, ओडिशातील 5 आणि जम्मू-काश्मीर आणि लडाखमधील प्रत्येकी एका जागेसाठी मतदान होणार आहे. पाचव्या फेरीत 4.26 कोटी महिला मतदारांसह 8.95 कोटीहून अधिक लोक मतदान करणार आहेत. 94,732 मतदान केंद्रांवर ९.४७ लाख मतदान अधिकारी तैनात करण्यात आले आहेत.

Horoscope Today : मोठी कामं करण्याची उत्तम संधी, पाहा कर्क राशीसाठी कसा आहे, आजचा दिवस 

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजपचे मिहीर कोटेचा आणि ठाकरे गटाचे संजय दिना पाटील यांच्यात लढत आहे. या जागेवर गेल्या काही दिवसांपासून आक्रमक प्रचार सुरू होता.

दरम्यान, मुंबईतील सहाही मतदारसंघात महायुतीचे उमेदवार निवडून येणार आहेत. शिवसेना कुणाची यावरही निवडणुकीच्या माध्यमातून जनता शिक्कामोर्तब करेल, मविआबाबत जनतेच्या मनात रोष आहे, असं वक्तव्य राहुल शेवाळेंनी केलंय

राज्यातील 13 जागांसाठी आज मतदान
मुंबई दक्षिण – अरविंद सावंत (ठाकरे गट) विरुद्ध यामिनी जाधव (शिंदे गट)
उत्तर पश्चिम – अमोल किर्तीकर (ठाकरे गट) विरुध्द रवींद्र वायकर (शिंदे गट)
दक्षिण मध्य – राहुल शेवाळे (शिंदे गट) विरुद्ध अनिल देसाई (ठाकरे गट)
ईशान्य मुंबई – संजय दिना पाटील (ठाकरे गट) विरुद्ध मिहिर कोटेचा (भाजप)
उत्तर मध्य – उज्ज्वल निकम (भाजप) विरुद्ध वर्षा गायकवाड (काँग्रेस)
मुंबई उत्तर – पियुष गोयल (भाजप) विरुद्ध भूषण पाटील (काँग्रेस)
कल्याण – श्रीकांत शिंदे (शिंदे गट) विरुद्द वैशाली दरेकर (ठाकरे गट)
ठाणे – नरेश म्हस्के (शिंदे गट) विरुद्ध राजन विचार (ठाकरे गट)
पालघर – भारती कामडी विरुद्ध हेमंत सावरा
भिवंडी – कपिल पाटील (भाजप) विरुद्ध सुरेश म्हात्रे (शरद पवार गट)
धुळे – सुभाष भामरे (भाजप) विरुद्ध शोभा बच्छाव (काँग्रेस).
नाशिक – हेमंत गोडसे (शिंदे गट) विरुद्ध राजाभाऊ वाझे (ठाकरे गट)
दिंडोरी – भारती पवार विरुद्ध भास्कर भगरे (शरद पवार गट)

देशातील रायबरेली आणि अमेठी या दोन हाय-प्रोफाइल मतदारसंघातही आजच मतदान होत आहे. तेथून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी रिंगणात आहेत. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या भवितव्याचाही या टप्प्यात निर्णय होणार आहे.

follow us