Download App

ठाकरेंची सहानुभूती अन् महायुतीचं फसलेलं गणित, देशमुखांना लागली खासदारकीची लॉटरी

संजय देशमुखांना (Sanjay Deshmukh) 594807 इतकी मते मिळाली असून त्यांनी राजश्री पाटलांचा तब्बल 94 हजार 473 मतांनी पराभव केला.

Loksabha Election 2024 Result : शिवसेनेचा (Shiv Sena) अभेद्य गड अशी ओळख असलेल्या यवतमाळ- वाशि लोकसभा (Yavatmal- Washim Lok Sabha) मतदारसंघाची यंदाची निवडणूक खऱ्या अर्थाने अटीतटीची झाली. मात्र, अखेरच्या क्षणी उद्धवसेनेच्या संजय देशमुखांनी बाजी मारली. संजय देशमुखांना (Sanjay Deshmukh) 594807 इतकी मते मिळाली असून त्यांनी राजश्री पाटलांचा तब्बल 94 हजार 473 मतांनी पराभव केला. दरम्यान, संजय देशमुखांच्या विजयाची कारणं काय आणि राजश्री पाटलांचं (Rajshree Patil) काय चूकल? याच विषयी जाणून घेऊ.

लोकसभेच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारतो; मला सरकारमधून मोकळं करण्याची मागणी करणार 

संजय देशमुखांनी निवडणुकीच्या ६ ते ८ महिन्यांपासून मतदारसंघ पिंजून काढण्याची त्यांची रणनिती यशस्वी ठरली. एका वर्षापासून मतदारसंघात़ साधलेला संवाद आणि महाआघाडीच्या सर्व कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची मिळालेली समर्थ साथ यामुळं त्यांचा विजय झाला. तर राजश्री पाटील यांनी मतदारसंघात विलंबाने ‘एन्ट्री’ केल्याने त्याचा फटका बसत त्यांची गच्छंती झाल्याचे राजकीय जाणकार सांगत आहेत.

महाराष्ट्रात पुन्हा कमबॅक करण्यासाठी सरकारमधून मोकळं करा – देवेंद्र फडणवीस 

मराठा-कुणबींनी शिंदेंची साथ सोडली
सलग पाचवेळा खासदार म्हणून निवडून आलेल्या भावनाताई गवळी यांना शिंदे गटाने उमेदवारी नाकारली. ही बाब मतदारांच्या पचनी पडली नाही. दरम्यानच्या काळात राजश्री पाटील यांच्या प्रचारकार्यात उतरून भावना गवळी यांनी आपली नाराजी नसल्याचे जाहीर केले. मात्र, तरीदेखील समर्थक आणि मराठा-कुणबी मतदार राजश्री पाटील यांच्या पाठीशी उभे राहिला नसल्यानं त्यांचा पराभव झाल्याचं बोलल्या जातं.

गटातटांचा राजश्री पाटलांना फटका
शिवसेनेत उभी फूट पडून भावना गवळी शिंदे गटात गेल्या. मात्र, वाशिम जिल्हा प्रमुखांसह जवळपास 80 टक्के पदाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्थेतील सदस्य हे मात्र उद्धवसेनेतच राहिले. त्याचा मोठा परिणाम या निवडणुकीत झाला

मतविभाजन टळल्याने देशमुख विजयी
वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार नसल्याने मतविभाजन टळले. त्याचा फायदा संजय देशमुखांना झाला. दुसरं असं की, लोकशाही व संविधानाला धोका असल्याचा विरोधकांचा प्रचार प्रभावी ठरला. त्यामुळं दलित, अल्पसंख्याक मतदारांनी महायुतीऐवजी महाविकास आघाडीला साथ दिली.

बंजारा मते देशमुखांकडे वळली
शिंदे गटाचे नेते संजय राठोड हे या लोकसभा मतदारसंघात सध्या मंत्री आहेत. त्यामुळं बंजारा समाजाची मते शिंदे सेनेच्या बाजूने वळतील, अशी चर्चा होती. मात्र, बंजारा समाजातील महंत सुनील महाराज यांनी उद्धव ठाकरेंशी हातमिळवणी केली. त्यामुळं सुनील महाजारांना मानणाऱ्या बंजारा समाजाची मतेही संजय देशमुखांच्या पारड्यात पडल्यानं राजश्री पाटलांचा पराभव झाला.

ठाकरेंना मिळणाऱ्या सहानुभतीने देशमुख विजयी
ग्रामीण भागात भाजपच्या शेतीविरोधी धोरणांबद्दल असलेला रोष आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल असलेली सहानुभूती ही संजय देशमुख मिळाली, त्यामुळं देशमुखांचा विजय अटळ होता, असं जाणकार सांगतात.

follow us