12th Paper Leak : बारावी पेपर फुटी प्रकरणी आता खळबळजनक माहिती समोर आली आहे. गणिताच्या पेपरसोबतच फिजिक्स आणि केमेस्ट्रीचाही पेपर फुटला होता, अशी खळबळजनक माहिती क्राईम ब्रांचनं दिली आहे. 27 फेब्रुवारीला फिजिक्स तर 1 मार्चला केमेस्ट्रिचा पेपर फुटल्याचं क्राईम ब्रांचनं म्हटले आहे.
Budget Session : पोलिसांसाठी विधिमंडळामध्ये आमदार जगताप आक्रमक
पेपरफुटी रोखण्यासाठी महाराष्ट्र बोर्डाकडून कोठोर पावलं उचलली जात असताना गणितासह तीन महत्त्वाचे पेपर फुटल्याची माहिती तपासात समोर आली आहे. या पेपरफुटी प्रकरणाची चौकशी सध्या सुरू असून,, यातूनच ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. हे दोन्हीही पेपर अहमदनगरमधील मातोश्री भागुबाई भामरे अॅग्रीकल्चरल अँड सायन्स कॉलेजच्या स्टाफकडून फुटल्याची माहिती समोर आली आहे.
याप्रकरणी गुन्हे शाखेनं महाविद्यालयातील व्यावस्थापकीय कर्मचारी आणि शिक्षकांचे मोबाईल जप्त करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्या व्हॉट्सअप डेटातून हे पेपर फुटल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबईतील दादर परिसरात असलेल्या एका महाविद्यालयात बारावीचा पेपर सुरू होण्यापूर्वी परीक्षा केंद्रावर हा पेपर मोबाईलवर आढळून आला होता. या मोबाइलमध्ये सोशल मीडियावर बारावीचा पेपर आधीच फोडल्याचे आढळून आले होते. याप्रकरणी पोलिसांनी तपास करत एका विद्यार्थ्याला ताब्यात घेतले होते. तो अल्पवयीन असल्यामुळे त्याची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली. त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे रुईछत्तीशीतील भांबरे महाविद्यालयातील प्राचार्य, दोन शिक्षक व दोन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर संचालकालाही पोलिसांनी अटक केली आहे.
119 विद्यार्थ्यांना आधीच मिळाले गणिताचे पेपर
भांबरे महाविद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागावा यासाठी हा प्रकार केल्याचे तपासात समोर आले आहे. महाविद्यालयात बारावीचे 337 विद्यार्थी होते त्यापैकी 119 विद्यार्थ्यांना गणिताच्या पेपर आधीच प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या, अशी धक्कादायक बाब पोलीस तपासातून समोर आली आहे. या तपासातून आणखी काय माहिती बाहेर येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.