Mumbai : छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी ३९७ कोटी मंजूर, शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय

मुंबई :  राज्य शासनाची मंत्रीमंडळ ( Cabinet Meeting )  बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आले.   शालेय शिक्षण विभागासाठी राज्यात पीएम श्री योजना राबवून शाळांचे सक्षमीकरण करणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी  पहिल्या टप्प्यात ८१६ शाळा विकसित करणार, असे ठरवण्यात आले आहे. तर अन्न व नागरी पुरवठा विभागाने धान शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out (4)

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out (4)

मुंबई :  राज्य शासनाची मंत्रीमंडळ ( Cabinet Meeting )  बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आले.   शालेय शिक्षण विभागासाठी राज्यात पीएम श्री योजना राबवून शाळांचे सक्षमीकरण करणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी  पहिल्या टप्प्यात ८१६ शाळा विकसित करणार, असे ठरवण्यात आले आहे. तर अन्न व नागरी पुरवठा विभागाने धान शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी १५ हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम देणार, असा निर्णय घेण्यात आला आहे. तसचे यासाठी १ हजार कोटींच्या  निधीसाठी  मान्यता देण्यात आली आहे. या राज्यातील जवळपास ५ लाख शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. यांसह अनेक महत्वपूर्ण निर्णय या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले आहेत.

याचबरोबर डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र आणि महाराष्ट्र सीओईपी विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या निवडीमध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. त्यासाठी अध्यादेश देखील  काढण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आला आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे.  त्याच पद्धतीने सार्वजनिक आरोग्य विभागाने महाराष्ट्र वैद्यकीय खरेदी प्राधिकरण अधिनियमास मान्यता दिली आहे. औषधी, वैद्यकीय उपकरणे खरेदी आता मुख्य सचिवांच्या उच्चस्तरीय समितीमार्फत करण्यात येईल असा निर्णय घेण्यात आला आहे.

तसेच पैनगंगा नदीवरील ११ बॅरेजेसच्या कामांना गती देणार असून त्यासाठी सुमारे ७८७ कोटी खर्चासाठी  मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे ७६९० हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. जलसंपदा विभागाने हा निर्णय घेतला आहे.

याचबरोबर पुणे जिल्ह्यातील तुळापूर आणि वढू बुद्रुक येथे छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळ, जेजुरी तीर्थक्षेत्र आणि सेवाग्राम विकास आराखड्यांचे सादरीकरण करण्यात आले. यासाठी छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळासाठी ३९७ कोटी ५४ लाख रुपये  खर्चाचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. तर जेजुरीसाठी १२७ कोटी २७ लाखाचा विकास आराखडा व
सेवाग्राम विकासासाठी १६२ कोटींचा विकास आराखड्याला मंजुरी देण्यात आली आहे.

तसेच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राज्यपाल म्हणून बदली झाली आहे. त्यामुळे राज्यपाल श्री भगत सिंह कोश्यारी यांचे राज्य मंत्रिमंडळाने  अभिनंदन केले आहे.  राज्याचे हिताचे निर्णय घेण्यात शासनाला मार्गदर्शन केल्याबद्दल कोश्यारींच्या अभिनंदनाचा प्रस्ताव संमत करण्यात आला आहे.

Exit mobile version