मोठी बातमी : देवदर्शनावरून पिकअप विहिरीत कोसळून 8 भाविक ठार, 6 जण वाचवले

देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या पिकअप वाहनाला भीषण अपघात झाला असून वाहन थेट विहिरीत कोसळल्याने 14 जणांचा मृत्यू झाला आहे

News Photo   2026 06 14T221034.250

मोठी बातमी : देवदर्शनावरून पिकअप विहिरीत कोसळून 8 भाविक ठार, 6 जण वाचवले

14 pilgrims die after pickup vehicle falls into well : सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात एक अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक अपघात घडला आहे. देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या पिकअप वाहनाला भीषण अपघात झाला असून वाहन थेट विहिरीत कोसळल्याने 14 जणांपैकी 8 जणांचा मृत्यू झाला. तर 6 जण वाचले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. सोलापूरच्या माळशिरस तालुक्यात देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या पिकअप वाहनाचा भीषण अपघात झाला. पिकअप वाहन रस्त्यालगत असलेल्या विहिरीत कोसळल्याने तब्बल 8 जणांचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, वाहनातील सर्व भाविक हे पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावचे रहिवासी होते. ते म्हसवड येथील सिद्धनाथ मंदिरात दर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपून परतत असताना हा भीषण अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे. रस्त्याच्या कडेलाच विहीर असल्याने चालकाला तिचा अंदाज न आल्यामुळे वाहन थेट विहिरीत कोसळल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलीस आणि बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेतली.

दोघांनी षडयंत्र रचलं; ज्येष्ठ नेते प्रकाश सोळंके यांचा पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप

विहिरीत कोसळलेल्या वाहनातील प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य राबवण्यात आले. मात्र या भीषण दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मृतांमध्ये महिला आणि पुरुषांचा समावेश असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेमुळे रांजणी गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलीस अधिक तपास करत आहेत.

देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाने घाला घातल्याने संपूर्ण राज्य हळहळ व्यक्त करत आहे. माळशिरसमधील या भीषण दुर्घटनेने पुन्हा एकदा रस्ते सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Exit mobile version