तुकाराम मुंढेच्या आदेशाला केराची टोपली, अभिनेता अरबाज शेखने समोर आणलं रुग्णालयाच वास्तव
Actor Arbaz Shaikh Viral Video : सुपरहिट चित्रपट सैराट फेम अभिनेता अरबाज शेखने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत रुग्णालय प्रशासनाच्या
Actor Arbaz Shaikh Viral Video : सुपरहिट चित्रपट सैराट फेम अभिनेता अरबाज शेखने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत रुग्णालय प्रशासनाच्या सक्तीवर बोट ठेवलंय आहे. या व्हिडिओमध्ये त्याने वडिलांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केली असल्याची माहिती देखील दिली आहे. तसेच उपचारासाठी मदत करण्याचे आवाहनही त्याने या व्हिडिओत केलं आहे. तर दुसरीकडे या व्हिडिओत त्याने रुग्णालयाने त्यांच्याच मेडिकलमधून औषधे घेण्याची सक्ती केल्याचा आरोप देखील केला आहे.
अभिनेता अरबाज शेखने (Actor Arbaz Shaikh Viral Video) दिलेल्या माहितीनुसार, त्यांने त्याच्या वडिलांना उपचारासाठी सोलापुरातील (Solapur) नोबल रुग्णालयात दाखल केला आहे. मात्र या रुग्णालयामधील मेडिकलमधूनच औषधे घेण्याची जबरदस्ती रुग्णालयाकडून करण्यात आली असल्याचा आरोप त्याच्याकडून करण्यात आला आहे. तसेच जर तिच औषधे बाहेरुन घेतली असती तर अर्ध्या किमतीत मिळाली असती असं देखील या व्हिडिओमध्ये त्याने म्हटले आहे.
आरोप खोटे – नोबल हॉस्पिटल
अरबाज शेखच्या आरोपावर आता नोबल हॉस्पिटलकडून (Noble Hospital) देखील प्रतिक्रिया समोर आली आहे. या हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. अमजदअली सय्यद यांनी अरबाज शेखने केलेले आरोप फेटाळून लावेल आहे. हे आरोप खोटे असल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात आला आहे. अरबाज शेख याचे वडील अत्यंत सिरीयस स्थितीत रुग्णालयात आले होते. ते केवळ काही तास रुग्णालयात दाखल होते. त्यांना गरज असलेलीच औषधे आम्ही त्यांना दिली आणि त्यासाठी आमच्या मेडिकलमधून औषधे घ्या अशी कोणतीही सक्ती करण्यात आलेली नव्हती अशी माहिती माध्ममांशी बोलताना डॉ. अमजदअली यांच्याकडून देण्यात आली होती.
तर दुसरीकडे काही दिवसांपूर्वीच रुग्णालयातील मेडिकलमधून औषधे खरेदी करणे कायद्यानं बंधनकारक नाही. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइक औषध कुठूनही खरेदी करु शकतात असा आदेश अन्न व औषधे प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram Munde) यांनी जारी केला आहे. मात्र या आदेशानंतरही रुग्णालय त्यांच्या मेडिकलमधून औषधे खरेदी करण्याची जबरदस्ती करत असल्याचा आरोप आता अभिनेता अरबाज शेखने केल्याने अन्न व औषध विभागाकडून काय कारवाई होणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.
FIFA World Cup 2026 ‘गोल्डन बूट’ साठी जोरदार लढत, मेस्सी की एमबाप्पे कोण मारणार बाजी?