बीड शिक्षण विभागात मोठी खळबळ; तब्बल 14 शिक्षक निलंबित, वाचा संपूर्ण यादी

प्रमाणपत्रे न सादर करणाऱ्या संबंधित सर्व शिक्षकांवर विभागीय चौकशी सुरू केली जाणार असून, पुढील आदेश येईपर्यंत ते निलंबित राहतील.

News Photo   2025 12 06T145917.288

बीड शिक्षण विभागात मोठी खळबळ; तब्बल 14 शिक्षक निलंबित, वाचा संपूर्ण यादी

बीड जिल्हा शिक्षण विभागात काल झालेल्या कारवाईची चर्चा सुरू आहे. (Beed) शिक्षण विभागाने 14 शिक्षकांना निलंबित केलं आहे. त्याने एकच खळबळ उडाली आहे. UDID कार्ड सादर करण्याच्या आदेशानंतरही काही शिक्षकांनी आपली प्रमाणपत्रे सादर केली नाहीत. वेळ देऊनही आदेशाची अंमलबजावणी न केल्याने जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने धडक कारवाई केली. 14 शिक्षकांना निलंबित करण्यात आलं आहे. काल शिक्षकांचा संप सुरू असतानाच ही कारवाई झाली आहे.

शिक्षण विभागाने UDID कार्ड पडताळणी मोहिम राबवली. त्यात प्रमाणपत्रांची वैधता तपासण्यात आली. त्यासाठी UDID कार्ड सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. अनेकदा शिक्षकांना स्मरण करुन देण्यात आले. नोटीस बजावण्यात आली. तरीही या 14 शिक्षकांनी आदेशाची अंमलबजावणी केली नाही. नोटीस देऊनही ते अनुपस्थित राहिले. बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांनी या कार्यवाहीविषयी माहिती दिली, त्यानुसार, शिस्तभंगाची कारवाई अनिवार्य आहे.

शाळा बंद आंदोलनातून शासनाला गर्भित इशारा;  शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा आंदोलनात उस्फुर्त सहभाग

प्रमाणपत्रे न सादर करणाऱ्या संबंधित सर्व शिक्षकांवर विभागीय चौकशी सुरू केली जाणार असून, पुढील आदेश येईपर्यंत ते निलंबित राहतील. दरम्यान, प्रशासनाने ही प्रमाणपत्र बोगस नसल्याचं स्पष्ट केलं. तर जी प्रमाणपत्रं जुनी आहेत. ती ऑनलाईन हवी आहेत. UDID कार्ड काढण्यासाठी शिक्षकांना 23 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर वेळोवेळी ही मुदत वाढवण्यात आली. विहित मुदतीत युडीआयडी कार्ड सादर न केल्याने या शिक्षकांवर कारवाई करण्यात आली. हे निलंबित शिक्षक अपंग असतील, पण त्यांनी विहित मुदतीत प्रमाणपत्र सादर न केल्याने त्यांना हा दणका देण्यात आला आहे.

बोगस दिव्यांगांची पडताळणी

सध्या बीड जिल्ह्यात बोगस अपंग प्रमाणपत्राआधारे नोकरी लाटली असेल तर त्यांची पडताळणी मोहिम सुरू आहे. त्यातंर्गत 400 लोकांच्या प्रमाणपत्रांची तपासणी करण्यात आली आहे. त्यासाठी UDID कार्डची मागणी करण्यात येत आहे. जर कोणी असं बोगस प्रमाणपत्र सादर केलं असेल तर 2016 मधील दिव्यांग कायद्यानुसार, त्याच्यावर गुन्हा नोंदविण्यात येणार आहे.

निलंबित शिक्षकांची यादी

संपत्ती जाधव रवींद्र धोंडीबा, स.शि., जि.प.प्रा.शा. हातगाव, ता. केज

उषा विठ्ठल माने , स.शि., जि.प.शाळा चौसाळा, बीड

संपत्ती भोसले, रामचंद्र छत्रगुण, स.शि., जि.प.शाळा चौसाळा, बीड

कल्पना गेणू चोपडे, स.शि., जि.प.प्रा.शा. डोईठाण, ता. आष्टी

हेमंत कारभारी शिनगारे, स.शि., जि.प.प्रा.शा. मोरेवाडी, ता. अंबाजोगाई

संजीवनी विक्रम कंटाळे, स.शि., झेडपी प्रा.शाळा रायमोहा, शिरुर

सय्यद नवाज मौलासाहेब, स.शि., G.P.P.S.S. राधाकृष्ण नगर सिरसाळा, परळी

अंजली मारोतीराव मुंडे, स.शि., G.P.P.S.S. गवळीवस्ती, बीड

शैला साहेबराव देवगुडे, स.शि., G.P.P.S.S. गांधीनगर मराठी, बीड

मनोज नरसिंगराव सुर्यवंशी, स.शि., जि.प.प्रा.शा. जोडवाडी (उजनी केंद्र), अंबाजोगाई

आश्रुबा विश्वनाथ भोसले, स.शि., जि.प.के.प्रा.शा. येळंबघाट, बीड

सिद्धू आसाराम वाटमांड, स.शि., जि.प.प्रा.शा. भोपालेवस्ती, पाटोदा

प्रकाश बलभीम भोसले, स.शि., जि.प.प्रा.शा. पिठी, पाटोदा

सुनंदा धोडोबा बहिर, स.शि., जि.प.के.प्रा.शा. कुसळंब, पाटोदा

Exit mobile version