Download App

आमदारांच्या सुरक्षेवर होतोय 150 कोटींचा खर्च; रोहित पवारांचा दावा

मुंबई : राज्यातील 60 आमदारांच्या सुरक्षेवर वर्षाला 144 कोटी रुपये खर्च केले जात असल्याचा दावा राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. त्याचबरोबर राज्यातील 12 खासदारांच्या सुरक्षेवर दर महिन्याला अडीच कोटी रुपये खर्च होत आहेत. तर वर्षाला दीडशे कोटी रुपये खर्च होत असल्याचा दावा रोहित पवार यांनी केला आहे. रोहित पवार यांनी ट्विट करत याबाबत आपली भूमिका मांडली आहे.

महाराष्ट्रात राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असतात. अशातच सत्ताधारी पक्षाच्या 60 आमदारांचा दरमहा खर्च हा 12 कोटी असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. दरम्यान विधी मंडळाच्या अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर रोहित पवार यांनी सत्ताधारी आमदारांच्या खर्चाचा आढावाच ट्वीटद्वारे मांडलाय.

आमदार रोहित पवार यांनी धनंजय मुंडे यांचा विधानसभेतील भाषणाचा व्हिडीओ ट्वीट केला आहे. या व्हिडीओत धनंजय मुंडे सत्ताधारी आमदारांच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित करताना दिसत आहेत. तर सत्ताधारी पक्षातील जवळपास 60 आमदारांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा लागत असेल तर या राज्यात खरंच कायदा व सुव्यवस्था चांगली आहे का?”, असा प्रश्न धनंजय मुंडे सभागृहात उपस्थित केला होता.

Tags

follow us