अहिल्यानगरमध्ये भाजपची गाडी सुसाट; भाजपच्या 3 तर राष्ट्रवादीच्या 2 जागा बिनविरोध

भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षासाठी परिस्थिती अनुकूल असल्याचं चित्र; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का.

WhatsApp Image 2026 01 02 At 3.39.31 PM

WhatsApp Image 2026 01 02 At 3.39.31 PM

2 candidates from NCP and 3 from BJP unopposed in Ahilyanagar : राज्यभरात महापालिका निवडणुकांची धामधूम पाहायला मिळत आहे. सर्वच राजकीय पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. त्यातच अहिल्यानगर(Ahilyanagar) महापालिकेत बिनविरोधांचा आकडा वाढतच चालला आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे(NCP Ajit Pawar) दोन उमदेवार काल बिनविरोध विजयी झाले होते. राष्ट्रवादीपाठोपाठ आता भाजपने(BJP) देखील आता आपलं खातं उघडलं आहे. प्रभाग क्र. 7 मधून भाजपच्या उमेदवार पुष्पा बोरुडे तर प्रभाग क्र. 10 मधून करण कारले हे बिनविरोध नगरसेवक झाले आहेत. पुष्पा बोरुडे यांच्यासमोर असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार रवींद्र वाकळे यांनी माघार घेतली, तर करण कराळे यांच्याविरोधात असलेल्या शिवसेनेच्या विशाल शितोळे यांचा अर्ज बाद झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्याचप्रमाणे प्रभाग क्र. 6 मधून भाजपच्या सोन्याबाई तायागा शिंदे या बिनविरोध निवडून आल्या आहेत.

Dhiraj Ghate Exclusive : पुण्यात भाजप किती जागा जिंकणार? धीरज घाटेंनी आकडाचं सांगितला

एकंदरीत परिस्थिती पाहता भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षासाठी परिस्थिती अनुकूल असल्याचं चित्र असून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. अहिल्यानगर महापालिकेसाठी अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजप यांची युती असून महायुतीचा घटकपक्ष असलेली शिवसेना स्वबळावर निवडणुकीला सामोरी जात आहे. शिंदेंच्या शिवसेनेला एकामागोमाग मोठे धक्के बसत असून काल 5 उमेदवारांचे अर्ज बाद झाले होते, तर आज एकाने माघार घेतल्याने शिंदेसेनेची डोकेदुखी वाढली आहे.

Exit mobile version