मुंबईत लोकल ट्रेनचा दरवाजा बंद करण्यावरुन वाद अन् 22 वर्षीय मयांकवर चाकूने वार

Mumbai Local  :  मुंबईत मान्सूनचे आगमन झाले असून सध्या मुंबईत मुसळधार पावसाची सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे मान्सूनच्या पहिल्याच दिवशी

Mumbai Local

Mumbai Local

Mumbai Local  :  मुंबईत मान्सूनचे आगमन झाले असून सध्या मुंबईत मुसळधार पावसाची सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे मान्सूनच्या पहिल्याच दिवशी मुंबईतून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. लोकल ट्रेनमध्ये दरवाजा बंद करण्याच्या वादातून एकाची हत्या करण्यात आली आहे. माहितीनुसार, पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट- नालासोपारा फास्ट लोकलमध्ये 23 जूनच्या रात्री एका प्रवाशावर चाकूने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात मयांक लोहार या 22 वर्षीय प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. तर आरोपी फरार असून रेल्वे पोलीस त्याचा शोध घेत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मयांक चर्चगेट- नालासोपारा (Churchgate-Nalasopara Local ) या फास्ट लोकलच्या प्रथम श्रेणी डब्यातून प्रवास करत होता. अंधेरी आणि बोरीवली स्थानकांदरम्यान मुसळधार पाऊस सुरु असल्याने मयांक (Mayank Lohar) आणि आरोपीचे डब्याचा दरवाजा बंद करण्यावरुन वाद झाले. हा वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपीने मयांकवर चाकूने वार करत लोकल बोरीवली स्थानकात दाखल होताच पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचत जखमी मयांकला आपत्कालीन वैद्यकीय कक्षात नेण्यात आले. यानंतर त्याला कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात हलविण्यात आले मात्र मयांकला वाचवण्यात अपयश आले.

Supriya Sule : 85 विकासकामं सांगितली, पण 4 चं केली…सुप्रियाताई उरलेला ‘विकास’ कधी करणार?

तर दुसरीकडे रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्हीमूळे आरोपीची ओळख पटली असून फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथके नियुक्त करण्यात आली असल्याची माहिती रेल्वे पोलिसांकडून देण्यात आली आहे.  या घटनेबाबत पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक म्हणाले की, लोकल बोरीवलीत पोहोचताच रेल्वे प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरु केले. जखमी प्रवाशाला शक्य तितक्या लवकर वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी सर्व यंत्रणा तत्परतेने कार्यरत होती.

Exit mobile version