मान्सूनची एन्ट्री पण शेतकऱ्यांनो ‘या’ तारखेपर्यंत पेरणी करु नका; जाणून घ्या हवामान विभागाचा इशारा
Maharashtra Monsoon : अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर मान्सूनचे विदर्भासह राज्यात आगमन झाले आहे. मान्सूनचे आगमन झाल्याने नागरिकांसह अडचणीत
Maharashtra Monsoon : अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर मान्सूनचे विदर्भासह राज्यात आगमन झाले आहे. मान्सूनचे आगमन झाल्याने नागरिकांसह अडचणीत असणाऱ्या शेतकऱ्यांना देखील मोठा दिलासा मिळाला आहे. मान्सूनचे आगमन झाल्यानंतर आता हवामान विभागाकडून पेरण्याबाबत शेतकऱ्यांना महत्त्वाचा सल्ला देण्यात आला आहे.
नागपूर प्रादेशित हवामान विभागाचे शास्त्रज्ञ प्रवीण कुमार म्हणाले की, यंदा विदर्भात मान्सून पोहोचायला 10 दिवसांचा विलंब झाला आहे मात्र आतापर्यंत मान्सूनने पूर्ण विदर्भ व्यापलेला नाही. गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ आणि वाशीम या जिल्ह्यांमध्ये सध्या मान्सूनची एन्ट्री झाली तर पुढील 2 ते 3 दिवसांत मान्सून विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्ये येणार असल्याची माहिती प्रवीण कुमार यांनी दिली आहे.
पेरणीची घाई करू नका – हवामान विभाग
तर दुसरीकडे मान्सूनची (Maharashtra Monsoon) राज्यात एन्ट्री झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करु नये असं हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. मान्सून दाखल झाला असला तरी सुरुवातीला पावसामध्ये काही दिवसांचा खंड पडू शकतो आणि मान्सूनचा दुसरा टप्पा सक्रिय 28 जून रोजी होणार असल्याने सध्या शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करु नये असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. जोपर्यंत 70 ते 100 मिमी पाऊस पडत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी लगेच पेरणीची घाई करु नये नाहीतर दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते.
लोहगड किल्ल्यावर व्यावसायिक केतन अग्रवालची हत्या; होणाऱ्या पत्नीसह 8 जणांवर गुन्हा दाखल
पुढील 6 ते 7 दिवस पश्चिम महाराष्ट्रात चांगला पाऊस
तर मुंबईसह मराठवाडा , पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मान्सूनने हजेरी लावली आहे. तर पुढील 6 ते 7 दिवस पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. तर विदर्भात सामान्य ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.