दिलासा! मान्सून पुण्यात दाखल, 48 तासांत मुंबईत दाखल होणार हवामान विभागाकडून मोठी अपडेट

Monsoon arrives Pune राज्यातील पावसाची प्रतीक्षा आता संपण्याची चिन्हे दिसत असून भारतीय हवामान विभागाने मान्सूनबाबत महत्त्वाची माहिती दिली.

Monsoon Update

Monsoon arrives Pune set to reach Mumbai within 48 hours major update from Meteorological Department : राज्यातील पावसाची प्रतीक्षा आता संपण्याची चिन्हे दिसत असून भारतीय हवामान विभागाने मान्सूनच्या प्रगतीबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. विभागाच्या अंदाजानुसार, पुढील 48 तासांत मान्सून मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे. दरम्यान, मान्सूनने पुणे शहरात प्रवेश केल्याची अधिकृत नोंद करण्यात आली आहे.

…म्हणून ओमराजेंनी घेतला शिंदे गटात जाण्याचा निर्णय; तानाजी सावंतांनी सांगितलं कारण

हवामान विभागाने जाहीर केलेल्या ताज्या स्थितीनुसार मान्सूनची सीमा अलिबाग, पुणे, निजामाबाद, दांतेवाडा, बलांगीर, सुंदरगड, गया आणि मुझफ्फरपूरपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे मुंबईसह कोकणातील नागरिकांना लवकरच दमदार पावसाचा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

ब्लॉकबस्टर चित्रपट तुंबाडची मंजुळा! दोन आठवड्यांत पार केला 15 कोटींचा टप्पा!

सामान्यतः जूनच्या पहिल्या आठवड्यात मुंबईत मान्सून दाखल होतो. मात्र यंदा त्याच्या आगमनाला विलंब झाल्याने उष्णता आणि दमट हवामानाचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत होता. रविवारी आणि सोमवारी मुंबई, ठाणे तसेच उपनगरांमध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळल्या. मात्र त्या अल्पकाळ टिकल्याने उकाड्यात फारसा फरक पडला नाही.

आधी भाजपला मतदान, मग शिंदे गटात प्रवेश! ओमराजे निंबाळकरांनी महाविकास आघाडीला दगा दिला का?

हवामान तज्ज्ञांच्या मते, एल निनोचा प्रभाव, कोरड्या हवेचा अडथळा आणि प्रभावी कमी दाबाच्या क्षेत्रांचा अभाव यामुळे मान्सूनची गती मंदावली होती. मात्र आता परिस्थितीत बदल होत असून 24 जूनपासून राज्यातील अनेक भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

विधान परिषद निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजय; 17 पैकी 16 जागांवर सरशी, नाशिकमध्ये गोकुळ गितेंनी दिला धक्का

विशेषतः दक्षिण कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि घाटमाथ्यावरील भागांमध्ये पावसासाठी अनुकूल वातावरण तयार होत आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि पुणे परिसरात मान्सूनची सक्रियता वाढू लागल्याची नोंद हवामान विभागाने केली आहे.

follow us