…म्हणून ओमराजेंनी घेतला शिंदे गटात जाण्याचा निर्णय; तानाजी सावंतांनी सांगितलं कारण

UBT MP Split ओमराजे निंबाळकरांनी शिंदे गटात प्रवेशाची घोषणा केली. यावर शिंदेंचे नेते आणि धाराशिवचे आमदार तानाजी सावंत यांनी स्पष्टीकरण दिलं.

Eknath Shinde

UBT MP Split Tanaji Sawant Explain on Omraje Nimbalkar Join Shivsena : ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसल्याचे चित्र समोर आले आहे. धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी रविवारी शिंदे गटात प्रवेश करण्याची घोषणा केली. मात्र, त्यांनी हा निर्णय का घेतला? यावर शिंदेंचे नेते आणि धाराशिवचे आमदार तानाजी सावंत यांनी स्पष्टीकरण दिलं. कारण या पक्ष प्रवेशाची म्हणजे ऑपरेशन टायगर जबाबदारी सावंत यांच्यावर होती.

नेमकं काय म्हणाले तानाजी सावंत?

ओमराजेंनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. त्यानंतर त्यांच्या वडिलांच्या निकालाचा जो भाग होता. त्यात ओमराजे आणि त्यांच्या कुटुंबाला 20 वर्षांनंतरही न्याय न मिळाल्याने दु: खी आहेत. शेवटी न्यायदेवता आहे पण ओमराजेंची खासदारकीची ही दुसरी टर्म आहे. पहिली पाच वर्ष देखील विरोधात गेली. त्यामुळे केंद्रातील मोठे प्रोजेक्ट मतदार संघात येत नव्हते. धाराशिव देशातील 3 नंबरचा मागासलेला जिल्हा आहे. तसेच ओमराजेंनी केसचा निकाल आणि राजकीय निर्णय या दोन वेगवेगळ्या गोष्टी असल्याचं सांगितलं होतं.

आधी भाजपला मतदान, मग शिंदे गटात प्रवेश! ओमराजे निंबाळकरांनी महाविकास आघाडीला दगा दिला का?

तसेच विकास आणि कार्यकर्त्यांच्या हितासाठी भूमिका बदलली. निधी मिळत नसल्याने या पदावर राहून करू काय? असंही ते म्हणाले. माझे त्यांच्याशी तात्विक मतभेद असतील पण आजची परिस्थिती वेगळी. ही जबाबदारी माझ्यावर होती. भावनेवर पोट भरत नाही. तसेच त्यांची भेट घेऊन पक्षप्रवेशाबाबत ठरवणार आहे. मी जेव्हा जेव्हा जिल्ह्यात येतो तेव्हा विकासाचा भूकंप करतो.

ओमराजे काय म्हणाले?

माझे वडिल पवनराजे निंबाळकर यांच्या हत्याकांडाचा निकाल माझ्या विरोधात गेल्यानंतर मला मुख्यमंत्री देवेंद्र फडमवीस यांचा फोन आला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही फोन आला. त्यांनी माझं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी बोलणं करून दिलं असं म्हणत ओमराजे यांनी आपला निर्णय जाहीर केला. त्याचबरोबर मी कोणत्याही दबावात येऊन शिंदे यांच्या शिवसेनेत जात नाही. माझ्यामागं कोणतीही ईडी सीबीआय चौकशी नाही.

विधान परिषद निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजय; 17 पैकी 16 जागांवर सरशी, नाशिकमध्ये गोकुळ गितेंनी दिला धक्का

माझा कोणताही व्यवसाय नाही जो वाचवण्यासाठी मी सत्ताधाऱ्यांकडं चाललोय. असं कुठलही कारण नाही ज्यामुळं मला जावं लागत आहे. परंतु, लोकांची काम करायची आहेत. साध लाईट डीपीचा घोटाळा झाला तरी लोक फोन करतात. आपण मदत करू शकत नाहीत ही मोठी कुचंबना आहे. त्यामुळं आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात काम करण्याचा निर्णय घेतला आहे असंही ओमराजे निंबाळकर म्हणाले आहेत.

follow us