Nagarparishad Election Result : आज राज्यातील 288 नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली असून या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. 288 पैकी 264 नगरपरिषदेसाठी आणि नगरपंचायतीसाठी राज्यात 2 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती तर 20 डिसेंबर रोजी 24 नगरपरिषदांसाठी आणि नगरपंचायतीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली होती. यंदा मुख्य लढत महायुतीमधील तिन्ही घटक पक्षांमध्ये पाहायला मिळाली आहे. काही ठिकाणी भाजपविरुद्ध शिंदे शिवसेना तर काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट विरुद्ध भाजप असा सामना रंगला होता.
