live now
Nagarparishad Election Result Live : सांगोल्यात शहाजीबापूंचाच दरारा; भाजपला अस्मान दाखवलं…
Nagarparishad Election Result : आज राज्यातील 288 नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल जाहीर होणार असून
Nagarparishad Election Result : आज राज्यातील 288 नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली असून या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. 288 पैकी 264 नगरपरिषदेसाठी आणि नगरपंचायतीसाठी राज्यात 2 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती तर 20 डिसेंबर रोजी 24 नगरपरिषदांसाठी आणि नगरपंचायतीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली होती. यंदा मुख्य लढत महायुतीमधील तिन्ही घटक पक्षांमध्ये पाहायला मिळाली आहे. काही ठिकाणी भाजपविरुद्ध शिंदे शिवसेना तर काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट विरुद्ध भाजप असा सामना रंगला होता.
LIVE NEWS & UPDATES
-
आमदार गोपीचंद पडळकर यांची आटपाडी नगरपंचायततीवर एक हाती सत्ता...
माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अमरसिंह बापू देशमुख आणि माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर साहेब यांच्या साथीने आटपाडी नगरपंचायतीवर यु. टी. जाधव सर 1177 मतांनी विजयी. या विजयाचा आनंद आमदार पडळकर यांनी उमेदवारांसोबत साजरा केला.
-
बारामती नगर परिषद अजितदादांना जोरदार धक्का
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या महिला शहराध्यक्ष अनिता गायकवाड यांचा पराभव. अपक्ष उमेदवार मनीषा संदीप बनकर या निवडून आल्या आहेत. अनिता गायकवाड यांचा ८०० मतांनी पराभव
-
ईश्वरपूरमध्ये 'तुतारी' जोरात वाजली! जयंत पाटलांची एकहाती सत्ता
ईश्वरपूर नगरपरिषदेच्या एकूण ३० जागांसाठी ही निवडणूक पार पडली. यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाने तब्बल २३ जागा जिंकत निर्विवाद बहुमत मिळवले आहे. दुसरीकडे, भाजप महायुतीला या निवडणुकीत मोठा धक्का बसला असून, त्यांना केवळ ७ जागांवर समाधान मानावे लागले आहे. विजयानंतर ईश्वरपूरमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून फटाक्यांची आतिषबाजी आणि गुलालांची उधळण करत जल्लोष करण्यात येत आहे.
-
सांगोल्यात शहाजीबापूंचाच दरारा...
सांगोल्यात शहाजीबापूंचाच दरारा...
धोबीपछाडीचा डाव टाकत भाजपला अस्मान दाखवलं...
सांगोला नगरपरिषदेवर शहाजीबापूंची एकहाती सत्ता...
एकनाथ शिंदेंची जाहीर सभेतून टीका-टिप्पणी झाली होती
या सभेनंतर शहाजीबापूंच्या कार्यालयावर निवडणूक आयोगाच्या पथकांनी धाड मारत झाडाझडती घेतली होती
भाजप आणि शिंदे गटामध्ये जोरदार संघर्ष झाला होता
अखेर सांगोल्यात शहाजीबापूंचाच दरारा असल्याचं चित्र स्पष्ट
-
सिंधुदुर्गात निलेश राणे ठरले वरचढ; नितेश राणेंना धक्का!
सिंधुदुर्गात कणकवली नगरपंचायतीतशहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी झाले असून या निवडणुकीमध्ये निलेश राणे वरचढ ठरले आहेत. तर, मंत्री नितेश राणेंना धक्का बसला आहे.
-
धनंजय मुंडे यांच्या बहिणी उर्मिला केंद्रे विजयी
नगरपालिका निवडणुकीचे निकाल हाती येत असून भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. दुसरीकडे धनंजय मुंडे यांची बहिणी उर्मिला केंद्रे या गंगाखेडमधून नगराध्यक्षपदासाठी उमेदवार होत्या. उर्मिला केंद्रे विजयी झाल्या आहेत. स्वत: धनंजय मुंडे प्रचारासाठी मैदानात उतरले होते.
-
इंदापुरात हर्षवर्धन पाटलांना मोठा धक्का!
इंदापुरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार विजय मिळवला असून 15 उमेदवार विजयी ठरले. कृष्णा भीमा विकास आघाडीचे पाच उमेदवार निवडून आले. नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे भरत शहा विजयी ठरले, तर प्रदीप गारटकारांचा पराभव झाला. माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांना भाजपचे नेते प्रवीण माने यांच्याकडून मोठा धक्का बसला आहे.
-
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला परळीत मोठा धक्का, शिवसेना शिंदे गटाचे व्यंकटेश शिंदे विजयी
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला परळीत मोठा धक्का
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार संध्या देशमुख यांचे पती दीपक देशमुख यांचा पराभव
दीपक देशमुख यांनी प्रभाग क्रमांक 6 मधून निवडणूक लढवली होती. या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचे व्यंकटेश शिंदे हे विजयी झाले आहेत.
-
ठाकरेंच्या शिवसेनेच्या जयश्री भिसे विजयी
पंढरपूर कुर्डूवाडी नगरपालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून, यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या जयश्री भिसे 600 मतांनी विजयी झाल्या आहेत. इथे भाजपचा पराभव झाला असून शरद पवार पक्षाचे 13 उमेदवार विजयी, शिवसेनेचा एक आणि अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे.
-
एकनाथ शिंदे यांचे स्वीय सहाय्यक बालाजी खतगावकर यांना राजकारणात पहिलं यश
एकनाथ शिंदे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विजयी. एकनाथ शिंदे यांचे स्वीय सहाय्यक बालाजी खतगावकर यांना राजकारणात पहिलं यश
