Download App

चक्क 36 पानांची विवाह पत्रिका! पत्रिकेतून लग्न सोहळ्याचं आगळं-वेगळं आवतनं

  • Written By: Last Updated:

36 page wedding card: लग्न म्हटलं की, लग्नपत्रिका आलीच. लग्नपत्रिका मिळाल्याशिवाय, लग्नाला येणार नाही, हा हेका अजूनही अनेकजण धरतात. पण, आता जसाजसा काळ बदलत चालला आहे, तशी विवाह करण्याच्या पध्दतीतही बदल होत आहेत. लग्नपत्रिकेचं स्वरूपही बदलत चाललं आहे. लग्नपत्रिका…. श्रींच्या आशिर्वादासह तारीख, वेळ, ठिकाणी, वधू-वरांची नावं, लग्नाला यायचा आग्रह….. हा सर्वसाधारण मजकूर पत्रिकेत असतो. मात्र, सध्या एक पत्रिका सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. शिव विवाह पध्दतीने होणाऱ्या एका लग्नाचं 36 पानांचं आवतन असलेली ही आगळी वेगळी पत्रिका चर्चचा विषयी झाली आहे.

विवाह जमवतांना 36 गुण पाहिले जातात, परंतु, येथे पत्रिकेमध्ये 36 पाने ही विविध विचारक, पुरोगामी व पौराणिक ऐतिहासिक सामाजिक या विषयांवर भाष्य करणारी आहे. नातवाईक व इतर नावांना बगल देत नवं दाम्पत्याच्या शैक्षणिक आलेखाच्या सचित्र परिचय दिला आहे. तर 36 महान व्यक्तींची फोटोसह माहिती दिली आहे.

छत्रपती संभाजीनगर येथील मराठी सेवा संघाचे चंद्रशेखर वसंत शिखरे यांची कन्या इशिता, आणि बल्लालवाडी ता. जुन्नर येथील मारूती प्रभाकर डोंगरे यांचा मुलगा मयूर यांचा शुभविवाह 23 एप्रिल रजोी छत्रतपी संभाजीनगर येथे होत आहे. पत्रिकेत वधू व वरचा फोटो व अल्प परिचय देण्यात आला आहे. इशिका व मयूर दोघेही उच्चशिक्षित असून जर्मनी येथे उच्च पदावर कार्यरत आहेत. याच बरोबर शिखरे परिवाराचा ग्रुप फोटो व माहिती देण्यात आली आहे.

अतिकच्या ‘त्या’ शेवटच्या पत्रात काही ‘बड्या’ नेत्यांची नावे?

आवली व संत तुकाराम, शिव पार्वती विवाह, सावित्रीबाई फुले आणि जोतिबा फुले यांची माहिती तसेच जिज्ञासक महदंबा, संत जनाबाई, संत मुक्ताबाई, अक्का महादेवी यांची माहिती देण्यात आली आहे. कॅप्टन लीलाताई व सेनानी डॉ. उत्तमराव पाटील जिजाऊ व शहाजीराजे, संत सोयराबाई व संत चोखामेळा, सईबाई व छत्रपती शिवराय, महाराणी देवी व सम्राट अशोक, महाराणी चिमणाबाई व सयाजीराव गायकवाड या उभयतांची तसेच ताराबाई शिंदे, रखमाबाई राऊत, बहिणाबाई चौधरी, सरोजिनी नायूड यांच्या सचित्र माहिती दिली आहे. शिवाय, संत-महात्यांचे विचारही पत्रिकेत छापले आहेत.

या पत्रिकेसाठी उत्तम दर्जाचा कागद आणि आधुनिक छपाई तंत्राचा वापर केला आहे. पुण्यातील जिजाऊ प्रकाशन यांनी ही पत्रिका तयार केली आहे. सर्वसाधारणपणे लग्नपत्रिकेत कुटूंबातील व्यक्तींची नावे असतात, पण या पत्रिकेत याचा कोठंही उल्लेख नसल्याने ही पत्रिका वाचून संग्रही ठेवण्यायोग्य आहे.

 

Tags

follow us