Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये एक मोठी घटना घडली आहे. केंद्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती विजया रहाटकर यांच्या नेतृत्वाखाली (Sambhajinagar) आयोगाने छत्रपती संभाजीनगर येथील सरकारी देखरेख बालगृहातून ९ अल्पवयीन मुली पळून गेल्याच्या अहवालाची गंभीर दखल घेतली आहे. मानसिक छळाला कंटाळून या मुली पळून गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली.
या घटनेनंतर रहाटकर यांनी गंभीर त्रुटीमुळे तातडीने कारवाईची आवश्यकता असल्याच्या सूचना केल्या. निष्पक्ष, कालबद्ध चौकशी, बीएनएस आणि पॉक्सो कायद्यांतर्गत जबाबदार अधिकाऱ्यांना अटक करण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्या. पीडितांचे त्वरित पुनर्वसन सुनिश्चित करण्यासाठी डीजीपींना पत्र पाठवण्यात आले आहे.
विद्यापीठं अन् महाविद्यालयांमधील रिक्त पदांच्या भरतीला वेग येणार; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
छत्रपती संभाजीनगर शहरातील छावणी परिसरातील विद्यादीप बालगृहातून मानसिक छळाला कंटाळून ९ मुली पळून गेल्या होत्या. राज्यात गाजलेल्या या प्रकरणाची गंभीर दखल घेत राष्ट्रीय महिला आयोगाने याप्रकरणी सुमोटो याचिका दाखल केली आहे. या विषयावर येत्या दोन दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी पोलीस महासंचालकांना दिले.
विद्यार्थी बालगृहातून ३० जूनला ९ मुली पळून गेल्या होत्या. त्याच दिवशी दामिनी पथकाला सात मुली सापडल्या. दुसऱ्या दिवशी आठवी मुलगी आणि दोन दिवसांपूर्वी नववी मुलगी सापडली. घटनेला ८ दिवस उलटले तरी याविषयी अजूनही कुणावरही कारवाई झाली नाही. मात्र, या प्रकरणावर विधिमंडळ अधिवेशनात चर्चा झाली.
या गंभीर प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. उपायुक्त (बाल विकास) राहुल मोरे (पुणे) या समितीचे अध्यक्ष आहेत. दरम्यान, राहुल मोरे आणि त्यांचे सहकारी संभाजीनगर शहरात दाखल झाले. त्यांनी विद्यादीप बालगृह, बालकल्याण समिती तसंच, जिल्हा महिला बाल विकास विभागाची चौकशी केली. आता या चौकशीतून नेमकी काय माहिती समोर येते हे पाहणं महत्वाचं ठरेल.