Download App

जितेंद्र आव्हाडांबद्दलच्या ‘त्या’ऑडिओ क्लिपबाबत मोठा खुलासा

ठाणे : आत्ता राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (jitendra Awhad)यांच्या संदर्भातील व्हायरल होणारी ऑडिओ क्लिपबाबत (Audio Clip)एक मोठी माहिती समोर आली आहे. ही ऑडिओ क्लिप रेकॉर्ड करणाऱ्या सुशांत संजय सुर्वेने (Sushant sanjay Surve)स्वतः प्रतिज्ञापत्र (Affidavit)लिहून देत मान्य केलं आहे. सुशांत म्हणाला की, आम्ही हा ऑडिओ स्वतः ठाणे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर (Mahesh Aher) यांच्या शेठ एव्हेलोन इमारतीमधील 18 व्या मजल्यावरील त्यांच्या घरी डायनिंग टेबलवर बसून स्वतः रेकॉर्ड केल्याचं प्रतिज्ञापत्रावर लिहून दिलं आहे.

प्रतिज्ञापत्रात म्हटलंय की, माझे आणि ठाणे महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश भाऊराव आहेर यांचे अत्यंत जवळचे संबंध होते. पण, ते ज्या विकृत मानसिकतेने प्रकरण हाताळत असत. त्यामुळं माझ्या मनात घृणा उत्पन्न झाली. आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्याबद्दल काही कारण नसताना त्यांच्या मनात अत्यंत द्वेष होता. त्याबाबतच्या अनेक रेकॉर्डींग आपल्याकडे असल्याचेही या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे.

Old Pension Scheme : सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपात फूट, सोलापूर महापालिका कर्मचाऱ्यांची संपातून माघार

एकेदिवशी त्यांनी बोलताना अतिशय घाणेरड्या शब्दांमध्ये त्यांच्या कन्येबद्दल आणि जावयाबद्दल उद्गार काढले. माझ्या लक्षात आले की, तो जितेंद्र आव्हाड यांची कन्या आणि त्यांच्या जावयाच्या खूनाचा कट रचत आहे. मी साधारण त्याच्याशी बोलत असताना माझ्या मोबाईलचा रेकॉर्डर ऑन ठेवत असे. आणि त्याची सगळी वक्तव्य माझ्या मोबाईलमध्ये घेत असे. त्यामुळे ही जी रेकॉर्डींग सोशल मिडीया तसेच विविध समाज माध्यमांतून व्हायरल झाली आहेत. ती देखील मीच माझ्या मोबाईलवर रेकॉर्ड केलेली आहेत. त्यामुळे त्याच्यात असत्य असे काहीच नाही.

यामागे माझा उद्देश एकच आहे की, समाजामध्ये असली विकृती वेळीच बाजूला झाली पाहिजे. महेश आहेर याला कुठून पैसे यायचे? कोण पैसे द्यायचे याबाबत मला इथ्यंभूत माहिती आहे. कारण मी दिवसातील 24 तासांमधील 18 तास त्याच्याबरोबरच असायचो. त्यामुळे त्याच्या अंगामध्ये किती विकृती आहेत, हे सर्वांत जास्त मला माहित आहे. त्याचे एम.एम.आर.डी.ए. तसेच बी.एस.यू.पी. मधील सगळे घोटाळे मला माहित आहेत, असंही या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे.

मी सुशांत संजय सुर्वे अत्यंत जबाबदारीनं कोणाच्याही व कोणत्याही दबावाला, आमिषाला बळी न पडता माझ्या आई-वडीलांनी माझ्यावर केलेल्या संस्काराला स्मरुन, माणूसकीची तुलना इतर कशाशीही होऊ शकत नाही, याचे भान ठेवून सदरचे सत्यप्रतिज्ञापत्र करीत आहे. अशा आशयाचं प्रतिज्ञापत्रात लिहून दिलं आहे.

Tags

follow us