Download App

Threat : अंबानी, बच्चन अन् धर्मेंद्र यांच्या घराबाहेर बॉम्ब लावलाय…

मुंबई : उद्योजक मुकेश अंबानी, अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांच्या घराबाहेर बॉम्ब लावलाय, अशा धमकीचा फोन एका अज्ञाताकडून नागपूर पोलिस कंट्रोलला आल्याने पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. काल नागपूर पोलिसांना धमकीचा फोन आल्याने एकच खळबळ उडाली आहे. अज्ञात व्यक्तीच्या फोननंतर पोलिस यंत्रणेची झोप उडाली असून पोलिसांकडून धमकी देणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेण्यात येत आहे.

अज्ञात व्यक्तीने मुकेश अंबानींना अँटालिया बंगला उडवून देण्याची धमकी दिली आहे. तसेच अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांचे बंगलेही बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकीच्या फोननंतर नागपूर पोलिसांनी तत्काळ मुंबई पोलिसांना माहिती दिलीय. माहिती मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांकडूनही धमकी देणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेण्यात येत आहे. पोलिसांच्या तपासात 112 नंबरवर पालघर जिल्ह्यातून हा फोन आल्याचं बोललं जातंय.

Exit Poll आला! कसब्यात भाजपला धक्का तर चिंचवडमध्ये जागा राखणार!

नेमकं प्रकरण काय?
काल एका अज्ञात व्यक्तीने नागपूर पोलिसांच्या कंट्रोल रुमला फोन केला. यावेळी अज्ञात व्यक्तीकडून अमिताभ बच्चन, मुकेश अंबानी, आणि धर्मेंद्र यांच्या घराबाहेर बॉम्ब लावण्यात आल्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर नागपूर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार मुंबई पोलिसांकडून तिन्ही ठिकाणांवर जाऊन बॉम्ब निरोधक पथकाने तपासणी केलीय. बराच वेळ तपासणी केल्यानंतरही पोलिसांच्या हाती यावेळी काहीच लागले नाही. त्यानंतर पोलिसांनी मोकळा श्वास घेतला.

हे तर भाजपचे दबावतंत्र.. कसब्यातील ‘त्या’ प्रकारावर सुषमा अंधारे संतापल्या

दरम्यान, मुंबईत 26/11 चा हल्ला घडल्यानंतर अनेकदा बॉम्ब लावून उडवण्याच्या धमक्या अज्ञातांकडून फोनद्वारे देण्यात आल्याचं समोर आलं होतं. मात्र, बॉम्बसदृश वस्तू किंवा तपासणीत पोलिसांच्या हाती आत्तापर्यंत काही लागलेलं नाही. मुंबईत हल्ला घडवण्यासाठी 25 जण सस्त्रासह दादरला येणार असल्याचीही धमकी पोलिसांनी मिळालीय. आता दहशतवादी मुंबईत केव्हा येणार? कुठे हल्ला करणार? याबाबत अद्याप पोलिसांना कोणतीही माहिती मिळालेली नसून पोलिस चक्रावल्याची परिस्थिती निर्माण झालीय.

Tags

follow us