Download App

राज्यात पावसाची जोरदार बॅटिंग; मुंबईसह ‘या’ जिल्ह्यातील शाळांना उद्या सुट्टी जाहीर

Maharashta Rain Update : गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह ठाणे, पालघर आणि इतर काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होताना दिसत आहे.

  • Written By: Last Updated:

Maharashta Rain Update : गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह ठाणे, पालघर आणि इतर काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. आज मुसळधार पावसामुळे दुपारच्या सत्रात मुंबईसह (Mumbai) ठाणे, नवी मुंबईमध्ये शाळांना सुट्टी देण्यात आली होती. तर आता शासनाने मोठा निर्णय घेत उद्या 19 ऑगस्ट रोजी मुंबई, ठाणे (Thane), पालघर(Palghar) , रायगड (Raigad) आणि नवी मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.

19 ऑगस्ट रोजी मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई येथे मुसळधार पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.  यामुळे मुंबईसह ठाणे, नवी मुंबई आणि रायगडमधील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

मुंबई महानगर पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील सर्व शाळा महाविद्यालयांना उद्या 19 ऑगस्ट रोजी मुंबईतील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. हवामान विभागाकडून उद्या मुंबईमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आल्याने मुंबई शहर आणि उपनगरातील सर्व शासकीय, खासगी, महानगरपालिका शाळा आणि महाविद्यालये यांना सुट्टी जाहीर करण्यात येत आहे.

या जिल्ह्यांना रेड अलर्ट

हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, नाशिक घाटमाथा, पुणे घाटमाथा आणि सातारा घाटमाथा येथे उद्या 19 ऑगस्ट रोजी मुसळधार पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाकडून या जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाटमाथा आणि गडचिरोलीसाठी ऑरेंज आणि धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

तर दुसरीकडे 20 ऑगस्ट रोजी पालघर, ठाणे, मुंबई, राडगड, नाशिक घाटमाथा, पुणे घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा आणि सातारा घाटमाथा येथे मुसळधार पावसाची शक्यता असल्याने या जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे.

Airtel Down: मोठी बातमी, अनेक शहरांमध्ये एअरटेल सेवा बंद

तर रत्नागिरी, सिंदुधुर्ग, धुळे, नंदुरबार, नाशिक, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळमध्ये येलो अलर्ट देण्यात आला आहे.

follow us