FIR Against MP Sanjay Raut: लोकसभेच्या (Lok Sabha) चौथ्या टप्प्यासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. सत्ताधारी आणि विरोधी गटातील उमेदवारांकडून तसेच नेत्यांकडून जोरदार सभा पार पडल्या. मात्र यानंतर ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ झाली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या विरोधात नगर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोकसभा निवडणूक प्रचार सभेत प्रशोभक वक्तव्य केल्याचे आरोपावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे नगरच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
गेला काही दिवसांपूर्वीच चौथ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी मतदान पार पडले. नगरमध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा लोकसभेचा सामना रंगला आहे लोकसभेचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जोरदार सभा देखील घेतल्या. यावेळी शरद पवार आदित्य ठाकरे यांच्यासह संजय राऊत यांच्या देखील सभा पार पडल्या.
दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या एका प्रचार सभेत बोलताना संजय राऊत म्हणाले होते की, छत्रपती शिवरायांचा जन्म महाराष्ट्रात झाला म्हणून महाराष्ट्राला इतिहास आहे मात्र औरंगजेबचा जन्म हा गुजरात मध्ये झाला आहे गुजरातची मातीची आहे ती औरंगजेबाची आहे त्याच मातीतून हे दोन व्यापारी जन्मले आहे. औरंगजेबाचा जन्म हा नरेंद्र मोदींच्या गावी झाला असून त्यामुळे मोदी हे औरंगजेबि वृत्तीने वागतायत. महाराष्ट्र जिंकण्याची स्वप्न बाळगणाऱ्या औरंगजेबाला महाराष्ट्रात गाडून त्याची कबर खणले आहे तेव्हा नरेंद्र मोदी तू कोण आहे असं वक्तव्य राऊत यांनी प्रचार सभेत केले होते.
जालना : दानवेंचा षटकार की काळेंचा विजय?; जरांगेंची भोकरदन सभा ठरणार ‘टर्निग पॉइंट’
देशाचा सर्वोच्च पद असलेल्या पंतप्रधानांविषयी अशी एकेरी भाषा करत तसेच धमकी वजा इशारा देणाऱ्या वक्तव्य हे सर्व पाहता राऊत यांच्या विरोधात दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणारे वक्तव्य या सर्वच्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकारानंतर आता महाविकास आघाडी देखील असलेले आहे तसेच सरकारकडून दडपशाही सुरू असल्याचा दावा आता विरोधकांकडून केला जातो आहे